अध्यापक विद्यालयात योग शिबिराचे आयोजन
अध्यापक विद्यालयामध्ये रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – शनिवार दि. ११/१०/ २०२५ रोजी अध्यापक विद्यालयामध्ये रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ.वैभव सादिगले,डॉ.संभाजी पाचकवडे,डॉ.उषा अवधूतराव,डॉ क्षितिजा कदम,डॉ संगीता पाटील तसेच अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच आर वाघमारे सर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमांमध्ये डॉ.वैभव सादिगले,डॉ.संभाजी पाचकवडे, डॉ संगीता पाटील तसेच डॉ.उषा अवधूतराव यांनी योगा विषयावरती तसेच महिलांचा आहार ,आजार याविषयी माहिती दिली.

अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच आर वाघमारे सर यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर डॉ.उषा अवधूतराव,डॉ क्षितिजा कदम,डॉ संगीता पाटील यांनी सर्व छात्र अध्यापकांना योगाचे नियम महत्त्व तसेच योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले व त्यांच्याकडून करून घेतले.
यावेळी सर्व छात्राध्यापिकांचे सीबीसी चेक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभारप्रदर्शन प्राध्यापक श्री गंगथडे सर यांनी केले.