भारतीय लोकशाही आणि महिलांच्या नेतृत्वाचा आदर्श जगासमोर-डॉ.नीलम गोऱ्हे
एक सशक्त लोकशाही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा प्रत्येक घटक, विशेषतः दिव्यांग नागरिक,समानतेने आणि सन्मानाने सहभागी होतात
बार्बाडोस/ज्ञानप्रवाह न्यूज,११ ऑक्टोबर २०२५- राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या (Commonwealth Parliamentary Association – CPA) ६८ व्या जागतिक अधिवेशनाचा आज बार्बाडोस येथे यशस्वी समारोप झाला.या अधिवेशनात जगभरातील सुमारे २० ते २२ देशांतील संसद सदस्य आणि ३०० च्या पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नांवर देखील चर्चा झाली. डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केले की एक सशक्त लोकशाही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा प्रत्येक घटक,विशेषतः दिव्यांग नागरिक,समानतेने आणि सन्मानाने सहभागी होतात.त्यांनी महिलांविरुद्ध हिंसा व भेदभावावरील पुर्ण वर्ज्य (Zero Tolerance )धोरणाची गरज अधोरेखित करत अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
शेवटच्या दिवशी परिषदेची सर्वसाधारण सभा झाली.त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व डॅा.नीलम गोऱ्हे यांनी केले. आपल्या परिषदेतील अनुभवाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या अधिवेशनात सहभागी होणे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी अनुभव होता.विविध देशांतील प्रतिनिधींशी संवादातून लिंग समानता, महिला आरक्षण,लोकशाही सुदृढीकरण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याबाबत नवे दृष्टिकोन समोर आले.

या अधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व राज्यसभा उपसभापती हरिवंश यांच्या भाषणाचे सर्व उपस्थित सदस्यांनी कौतुक केले.बार्बाडोसच्या पंतप्रधान श्रीमती मिया मोटली व अध्यक्ष श्रीमती सॅंड्रा मेसन यांचे विचार ऐकता आले.
नताशा अशगर साऊथ वेल्शच्या पुर्व वेल्श कॅाझर्हेटिवह्व पक्षाच्या खासदार,जुआन वॅाटरसन एसएचके हाऊस ऑफ किज हा इंग्लंडच्या स्वायत्त आयलॅाफ मॅन प्रदेशचे अध्यक्ष, त्रिनिदाद व टोबॅगोचे सिनेटचे अध्यक्ष वडे स्टिफन मार्क यांच्या समवेत चर्चा व संवाद झाला.