सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने जुगार अड्ड्‌यावर धडक कारवाई करत केला लाखोंचा मुद्देमाल जप्त

सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने जुगार अड्ड्‌यावर धडक कारवाई करत केला लाखोंचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१०/२०२५ – दि. ११/१०/२०२५ रोजी सोमवार पेठ रोजा गल्ली, करकंब येथे सिमेंट पत्राचे शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे रा.करकंब ता. पंढरपूर व विजय बाबुराव वंजारी रा.करकंब ता.पंढरपूर हे अवैधरीत्या जुगार अड्डा चालवत असताना तसेच विजय बाबुराव वंजारी रा. करकंब ता.पंढरपूर हा पत्राशेड जवळच्या खोलीत त्याचे ताब्यात बेकायदेशीररीत्या देशी दारु बाळगलेल्या परिस्थितीत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाने जावून छापा कारवाई केली असता मौजे सोमवार पेठ रोजा गल्ली, करकंब येथे सिमेंट पत्र्याचे शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे रा.करकंब ता.पंढरपूर हा १४ इसमांसोबत ५२ पानी पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून खेळत असताना मिळून आले आहेत.विजय बाबुराव वंजारी हा पत्राशेडच्या जवळच्या खोलीत त्याचे ताब्यात बेकायदेशीर देशी दारुही जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला आहे.

मौजे सोमवार पेठ रोजा गल्ली करकंब येथे सिमेंट पत्राचे शेडमध्ये पत्ते खेळण्याकरीता आलेल्या इसमांकडे दुचाकी वाहने, मोबाईल,रोख रक्कम, ५२ पानी पत्त्याचे डाव, तसेच रोख रक्कम ४१,४३०/-रुपये, १४ मोबाईल फोन १,२०,०००/- रुपये,७ मोटारसायकल ३,९०,०००, देशी दारु ७२,१९२/- रुपये असा एकुण ६,२३,६२२/- रुपये असा मुद्दे‌माल हस्तगत करण्यात आला आहे.त्याबाबत करकंब पोलीस ठाण्यात वरील १५ इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे व विजय बाबुराव बंजारी रा.करकंब ता.पंढरपूर याचेवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड,पोह/निलेश रोंगे,पोह/सातव,पोकों/हुलजंती, पोकों/लोंढे,पोकों/कांबळे,पोकों/अजित जाधव,चापोको/मुजावर,मपोकों/माने यांनी पार पाडली.

Leave a Reply

Back To Top