स्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2025 : 31 ऑक्टोबरला मुंबईत होणार शानदार सोहळा

स्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2025 : 31 ऑक्टोबरला मुंबईत होणार शानदार सोहळा

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 20 – महाराष्ट्र ही भूमी इतिहास घडविणाऱ्या आणि राष्ट्र घडविणाऱ्या रत्नांची आहे. कला,संस्कृती, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, क्रीडा, नाट्य, सिनेमा आणि राजकारण अशा सर्व क्षेत्रांत कार्यरत गुणी व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दरवर्षी साप्ताहिक स्टार महाराष्ट्र तर्फे स्टार महाराष्ट्र अवॉर्ड प्रदान करण्यात येतो.

महाराष्ट्रातील गुणीजनांचा सन्मान

या वर्षीचा स्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2025 चा शानदार सोहळा शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.राज्याच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे.

राज्य आणि राष्ट्रीय नेते दर्शवतील उपस्थिती

या प्रतिष्ठित सोहळ्याचे मुख्य अतिथी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले असतील. या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे,राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रताप सरनाईक तसेच मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर,आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रसाद लाड आदी उपस्थित राहणार आहेत.

विशेष सत्कार आणि गौरव सोहळा

या सोहळ्यात विशेष सत्कार राज्यसभा खासदार ऍड. उज्ज्वल निकम, मेधाताई कुलकर्णी, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रवीण दरेकर यांचा करण्यात येणार आहे.

१४वा वर्धापनदिन आणि सांस्कृतिक कार्यक्रम

साप्ताहिक ‘स्टार महाराष्ट्र’ चा यंदा १४वा वर्धापनदिन साजरा होत असून यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे. कार्यक्रमात मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील नामांकित कलाकार,गायक, नर्तक आणि सेलिब्रिटींचा सहभाग असेल. दिवसभर विद्यानंद गाणी,नृत्य,लावणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील.

मुख्य कार्यक्रम दुपारी १२ वाजता

स्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2025’ चा मुख्य सोहळा दुपारी १२ वाजता सुरू होईल. बैठक व्यवस्था मर्यादित असल्याने कार्यक्रमास प्रवेश फक्त निमंत्रितांनाच देण्यात येणार आहे, अशी माहिती साप्ताहिक स्टार महाराष्ट्रचे संपादक हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Back To Top