पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात 84 कोटींची अतिवृष्टी मदत खात्यावर होणार जमा

शेतकऱ्यांच्या दिवाळीत गोडवा : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात 84 कोटींची अतिवृष्टी मदत खात्यावर होणार जमा

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज– पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत, सरकारने ८४ कोटी ४५ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीपूर्वी सर्व नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

शेतकऱ्यांना दिलासा,दिवाळीपूर्वी जमा होणार आर्थिक मदत

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील ८८ हजार ५०५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नुकसानभरपाई मिळणार आहे. पंढरपूर तालुक्यातील २८,७७५ शेतकऱ्यांना २६ कोटी ४५ लाख, तर मंगळवेढा तालुक्यातील ५९,७३० शेतकऱ्यांना ५८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या पाठीशी – आमदार समाधान आवताडे

अतिवृष्टीमुळे मका,सूर्यफूल,बाजरी,टोमॅटो, मिरची,कांदा, भुईमुग,उडीद,डाळिंब, दोडका,पेरू आदी पिकांचे नुकसान झाले होते. या संकटाच्या काळात आमदार समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेतली आणि मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आपले कार्यालय आणि स्वीय सहाय्यकांचे क्रमांक खुले ठेवत अधिकाऱ्यांकडे होणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविण्याचे काम केले.

मारापुर-बोराळे मंडलातील शेतकऱ्यांनाही दिला दिलासा

मारापुर आणि बोराळे मंडलातील पर्जन्यमापक यंत्रात बिघाड झाल्याने सुरुवातीला या भागांचा समावेश नुकसान भरपाईत झाला नव्हता.मात्र आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून आकडेवारीत सुधारणा करवून घेत या दोन्ही मंडलांचा समावेश करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.

अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक

गेल्या काही आठवड्यांपासून अधिकाऱ्यांनी पंचनाम्यांचे काम वेगाने पूर्ण केले असून काही ठिकाणी अद्याप प्रक्रिया सुरू आहे. अनेक विहिरींच्या पडझडीबाबतही मदतीची प्रक्रिया पंचायत समितीकडे पाठविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, हेच खरे समाधान– आमदार आवताडे

सततच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदमय होणार आहे, असे सांगताना आमदार समाधान आवताडे म्हणाले,शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य यावे, हीच खरी दिवाळी. आम्ही अधिकाऱ्यांना रात्रंदिवस कामाला लावले आणि आज त्या मेहनतीचे फळ शेतकऱ्यांना मिळत आहे.

ज्ञानप्रवाहन्यूज,आमदारसमाधानआवताडे, अतिवृष्टीमदत, शेतकऱ्यांचीदिवाळी, पंढरपूरमंगळवेढा,कृषिमदत, शेतकरीदिलासा,सरकारकडूनमदत,महाराष्ट्रशेतकरी,BalirajaSmilesAgain,ReliefForFarmers, DiwaliGiftToFarmers,

Leave a Reply

Back To Top