अँड दीपक पवार यांना सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर कारवाईचे आश्वासन

अँड दीपक पवार यांना सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर कारवाईचे आश्वासन adv Deepak Pawar assured of action against Sahakar Shiromani Sugar Factory
     जैनवाडी ,ता.पंढरपूर - सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी तालुका पंढरपूर यांच्यावरती साखर आयुक्त यांनी दिनांक २३/०६/२०२१ रोजी आरआरसी कारवाईचा आदेश दिला. आरआरसी कारवाईचा आदेश होऊन दोन महिने उलटून गेले तरी देखील शेतकऱ्यांना एफआरफी ची रक्कम व त्यावरील व्याज मिळाले नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना भेटून निवेदन दिले व आरआरसी कारवाई ची अंमलबजावणी त्वरित करून येत्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्यांच्या हक्काची रक्कम लवकरात लवकर त्यांना उपलब्ध करून द्यावी अन्यथा इतर न्यायसंस्थेचे दरवाजे आम्हाला ठोठवावे लागतील व आपल्या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरणार नाही असे निवेदन दिले. 

येत्या ८ दिवसामध्ये कारवाई करू असें आश्वासन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

अन्यथा पुढील प्रशासकीय कारवाई करण्याचा आदेश

तसेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी यांच्याकडे सभासद यादी मिळावी म्हणून गेल्या दोन महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत.प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर यांनी दिनांक १४ जुलै २०२१ रोजी अर्जदार अँड दीपक पवार यांनी मागितलेली सभासदांची माहिती सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना यांनी देणे बंधनकारक असून ती माहिती त्वरित द्यावी अशा पद्धतीचा आदेश केला होता, परंतु आजतागायत सभासदांची माहिती दिलेली नाही म्हणून प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांनी आज २७ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांना त्वरित माहिती द्यावी अन्यथा पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा आदेश काढलेला आहे अशी माहिती अँड दीपक पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: