पालवी – प्रभा हीरा प्रतिष्ठानला Forbes India We Serve India (Season 2) पुरस्काराने गौरव
महिलांच्या नेतृत्वाखालील सामाजिक नवोपक्रमासाठी पालवी – प्रभा हीरा प्रतिष्ठान ला राष्ट्रीय सन्मान
वाशी,नवी मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ८ नोव्हेंबर २०२५ – सामाजिक परिवर्तन आणि महिलांच्या नेतृत्वाखालील नवोपक्रमासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पालवी- प्रभा हीरा प्रतिष्ठान ला Forbes India – We Serve India (Season 2) या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा प्रतिष्ठित सन्मान Women-led Social Innovation (West Zone of India) या विभागात मिळाला आहे. हा पुरस्कार प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ डिंपल घाडगे आणि तेजस डिंपल घाडगे यांना भारत सरकारचे जड उद्योग व पोलाद राज्यमंत्री भूपतिराजू श्रीनिवास वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला आमदार पी.विष्णू कुमार राजू (विधानसभा सदस्य, विशाखापट्टणम व भाजप फ्लोअर लीडर),आमदार पल्ला श्रीनिवास राव आणि आमदार गौथू सिरीषा या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

Forbes India – We Serve India हा Lions Clubs International आणि Network18/News18 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक राष्ट्रीय उपक्रम आहे, जो देशभरातील जनकल्याणासाठी झटणाऱ्या समाजसेवकांना, उद्योजकांना आणि संस्थांना गौरवितो.

पालवी – प्रभा हीरा प्रतिष्ठान (www.palawi.org) गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील दुर्बल घटकांसाठी, विशेषतः महिलांसाठी आणि बालकांसाठी कार्यरत आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र आणि पश्चिम भारतात सामाजिक बदलाची प्रेरणादायी लाट निर्माण झाली आहे.

