पंढरपूरातून विनय सखाराम जावीर बेपत्ता – पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – विनय सखाराम जावीर, वय ३८ वर्षे, राहणार गौतम विद्यालय शेजारी आंबेडकर नगर, पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर हे दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ पासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक ११३/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर बेपत्ता व्यक्तीबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास संपर्क क्रमांक ७७७६९०६०७७ या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा.
ही माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार ब.न.१७७१ बी. एस. वाघमारे यांनी दिली आहे.पंढरपूर शहर पोलिस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे संपर्क करावा.

