ई-केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांनी त्वरित करावे अपडेट — तहसिलदार सचिन लंगुटे यांचे आवाहन
पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 नोव्हेंबर — पंढरपूर तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांच्या खात्यात निधी जमा झालेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.

तालुक्यात पुर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे तहसिलदारांनी स्पष्ट केले.

