समाजातील गरजूंना मदत म्हणजे ईश्वराची सेवा : अनुजा सुशांत पाटील

समाजातील गरजूंना मदत म्हणजे ईश्वराची सेवा : अनुजा सुशांत पाटील

डॉ.सुशांत पाटील ग्रुप,अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशन पुणे आयोजित फुलेनगरच्या शासकीय भिक्षेकरी स्विकार केंद्रात ब्लॅंकेट व स्वेटर वाटप,श्रमदान कार्यक्रम संपन्न

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१५/११/२०२५ – सामाजिक भावनेने गरजवंतासाठी अनुजा पाटील फौंडेशनच्या वतीने आज आम्ही ब्लॅंकेट्स व स्वेटर्स देऊ शकलो, याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यामुळे मानवातील ईश्वराची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. भविष्यातही आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत फाऊंडेशनमार्फत देण्यात येईल. ही सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाल्या बद्दल केंद्रातील सर्वांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करते,असे प्रतिपादन अनुजा सुशांत पाटील यांनी येथे केले.

वाढत्या हिवाळ्याच्या तीव्रतेचा विचार करून आज अनुजा सुशांत पाटील फाऊंडेशनतर्फे फुलेनगर येथील शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्रातील दाखल व्यक्तींना ब्लॅंकेट्स व स्वेटर्स वाटप करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी केंद्र परिसरात श्रमदान करत परिसर स्वच्छता केली त्यावेळी त्या बोलत होत्या.

फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक डॉ.श्रीराम चव्हाण म्हणाले,
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे…
निराधार आभाळाचा तोच भार साहे.
मधुकर जोशी लिखित या गीताचा उल्लेख करत त्यांनी फाऊंडेशनची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.त्यांनी सांगितले की,संस्थेचे संस्थापक, मार्गदर्शक व प्रेरणास्थान असलेल्या ऍड.अनुजा सुशांत पाटील,डॉ.सुशांत पाटील यांच्या प्रेरणेने आजचे दानकार्य व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.

फाऊंडेशनतर्फे गेल्या काही महिन्यांत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकरी बांधवांना रेनकोट, छत्र्या व फराळाचे साहित्य वाटप, दीडशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती, अनाथ आश्रम व वृद्धाश्रम येथे अन्नधान्य, वस्त्रे, औषधे वाटप, समाजातील गरजूंना सातत्याने विविध उपक्रमांद्वारे मदत असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाला अथर्व सुशांत पाटील, गणेश चव्हाण अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मनपा शाळा बालेवाडी,आनंद घाटे, संस्थापक मातृछाया बालक आश्रम, डॉ. गणेश पवार सामाजिक कार्यकर्ते, प्रो. किरण शेजुळ,प्रो.डॉ.लक्ष्मण रेनापुरे,मदन आडे,डी.एस.कुटे अधीक्षक,शासकीय भिक्षेकरी स्विकार केंद्र,डॉ.अरुंधती धात्रक, अनघा दवणे परीविक्षा अधिकारी,डी.डी. बोराडे, राहुल बिवाल, संतोष आमले, काजल खराडे आदी यावेळी उपस्थित होते. मातृछाया बालक आश्रमाचे संस्थापक आनंद घाटे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Back To Top