आ राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आ आवताडे यांच्या विविध ठिकाणी घोंगडी बैठका संपन्न
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०२/०४/२०२४ – सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी घोंगडी बैठका घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे. आ. समाधान आवताडे यांनी मंगळवारी हुलजंती, आसबेवाडी ,येळगी, सलगर खु.या गावांमध्ये ग्रामस्थांच्या व मतदारांच्या उपस्थितीमध्ये घोंगडी बैठक घेऊन प्रचार सुरू केला आहे.
सदर बैठकांप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की,गेल्या १० वर्षात संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अनेक लोककेंद्रीत योजनांचा कार्यक्रम राबवला गेला असल्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन दिसून आले आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून एकजुटीने आणि एक दिलाने त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे.
या बैठकांमध्ये त्यांच्यासमवेत श्री संत दामाजी शुगर माजी व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी,माजी संचालक विजय माने,माजी उपसभापती शिवाजीराव पटाप,उद्योजक सुधाकर मासाळ,एम.डी.माळी,सरपंच सचिन चव्हाण,अमोल माने,विठ्ठल सरगर,कांबळे सर,भाजपा विधानसभा विस्तारक रमेश मोरे,ग्रा.पं.सदस्य नागेश मासाळ,यल्लाप्पा बंडगर आदी मान्यवर तसेच विविध गावांचे मान्यवर ग्रामस्थ व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा पक्षाने सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करताना कधीही कुणाची जात,पात,धर्म विचारला नाही आणि विचारली जाणार नसल्यामुळे प्रामाणिकपणे काम करणे आणि जनतेचा विश्वास संपादित करणे हेच पक्षाचे लक्ष असते असेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचून पक्षाचे ध्येय धोरणे सामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहचवल्यास विजयाचा मार्ग आणखी सुकर होईल असे त्यांनी म्हटले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------