तालुक्यातील पाच गावांतील निर्बंध शिथिल – प्रांताधिकारी गजानन गुरव

पंढरपूर तालुक्यातील पाच गावांतील निर्बंध शिथिल – प्रांताधिकारी गुरव यांची माहिती Restrictions in five villages in the taluka relaxed – Information of Prantadhikari Gurav

पंढरपूर दि. 01/09/2021:- तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील पाच गावांमध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन केले आहे. या गावांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने पाच गावांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

तालुक्यातील ग्रामीण कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असतील ते संपूर्ण गांव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील 28 गावांमध्ये कडक निर्बंध जाहीर करण्यात आले होते. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्याने तालुक्यातील सुपली, पटवर्धन कुरोली, भोसे, लोणारवाडी व गादेगांव या गावांमध्ये पाचपेक्षा कमी रुग्ण बाधित असल्याने निर्बंध शिथिल केले असल्याचे प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.

निर्बंध शिथिल करण्यापूर्वी तालुक्यातील सुपली येथे 12 , पटवर्धन कुरोली-31, भोसे- 29, लोणारवाडी -13 तसेच गादेगांव येथे 31 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. या पाचही गावांतील नागरिकांची कोरोना चाचणी, वेळेत उपचार तसेच प्रशासनाने केलेल्या आवश्यक उपाययोजना व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केल्याने गावांतील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. तालुक्यातील कडक निर्बंध असलेल्या इतर गावांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन करावे व आपले गांव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री. गुरव यांनी केले.

बोहाळी गावांत कडक निर्बंध

तालुक्यातील बोहाळी गावांमध्ये 10 पेक्षा अधिक रुग्ण संख्या वाढल्याने दिनांक 02 सप्टेबर 2021 पासून या गावांमध्ये पुढील 14 दिवस कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या गावामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहतील. तसेच बोहाळी मुख्य रस्ता सोडून इतर सर्व मार्ग बंद करावेत. गावांमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा व वैद्यकीय साहित्य उपलब्ध ठेवावे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: