अनाथ विद्यार्थ्यांना देणार मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती – राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

अनाथ विद्यार्थ्यांना देणार मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती – राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम Free education and scholarships to be given to orphans – NCP leader Kalyanrao Kale’s birthday activities
पंढरपूर/प्रतिनिधी दि.01/09/2021 -  कोरोना काळात पंढरपूर तालुक्यातील अनेक कुटुंबातील सदस्यांना प्राण गमवावे लागले तर काही मुलांचे मातृ-पितृ छत्र हरवले अशा अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारण्यासाठी वसंतराव काळे शैक्षणिक संकुल पुढे सरसावले आहे.

     राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar व खासदार सुप्रियाताई सुळे Supriya tai sule यांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी जिवलग योजनेला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते NCP तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वसंतराव काळे शैक्षणिक संकुलात प्रवेश घेतलेल्या ज्यांचे आई-वडील कोरोनामुळे मयत होवून अनाथ विद्यार्थ्यांचा संपुर्ण शैक्षणिक खर्च व दरमहा रु.1000/- शिष्यवृत्ती  देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे यांनी केली.

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना आई-वडीलांचे प्रेम कोणीच देवू शकणार नाही. मात्र आता नातेवाईकांकडे राहणाऱ्या या विद्यार्थ्यांची वसंतराव काळे शैक्षणिक संकुल पालकत्व स्विकारुन त्यांची शैक्षणिक फी, शालेय साहित्य, गणवेश, येणे जाणेसाठी बसचा खर्च, परिक्षा फी इयत्ता पाचवीपासून बारावीपर्यंत दरमहा रु. 1000/- मदत केली जाणार आहे.त्याचबरोबर अनाथ झालेल्या मुलांसाठी शिक्षक व मुलींसाठी शिक्षिका या वात्सल्य दुत म्हणून कार्य करणार असून नियमित त्यांच्या संपर्कात राहून अडी अडचणी सोडविण्यासाठी तत्पर राहणार आहेत.

श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडीकुरोली संचलित, वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली,भैरवनाथ विद्यालय व वसंतराव काळे कनिष्ठ महाविद्यालय आढीव , श्रीमंतराव काळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जैनवाडी, मॉडर्न हायस्कुल पिराची कुरोली, वसंतराव काळे आय.टी.आय.कॉलेज वाडीकुरोली, वसंतराव काळे अध्यापक विद्यालय धोंडेवाडी, वसंतराव काळे नर्सिंग कॉलेज वाडीकुरोली या शाळातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने अनाथ विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: