कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी ‘Y-Break’ चा वापर करावा-केंद्रीय राज्यमंत्री डॉ मुंजपारा

कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी ‘Y-Break’ चा वापर करावा-केंद्रीय राज्यमंत्री डॉ मुंजपारा Use of ‘Y-Break’ to reduce workplace stress and improve productivity: Union Minister of State Dr. Munjpara


नवी दिल्ली, 05 SEP 2021, PIB Mumbai – आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या आठवडाभर साजऱ्या झालेल्या सोहळ्याचा समारोप, योग ब्रेक (Y-Break) अँपच्या उपयुक्ततेसंदर्भातील वेबिनारसह झाला. यात देशभरातील तज्ज्ञ आणि नागरिकांचा सहभाग दिसून आला.

वेबिनारचे उद्घाटन करताना आयुष आणि महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई म्हणाले,“वाय – ब्रेक शिष्टाचारामधील योगासने छातीमधील पोकळी खुली करायला आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला सहाय्य्यकारी ठरतील. मला आशा आहे की, संपूर्ण भारतातील लोक कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि उत्पादक शक्ती सुधारण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी शिष्टाचार स्वीकारतील. “

वाय – ब्रेक अँपच्या उपयुक्ततते संदर्भातील वेबिनारमध्ये योग अभ्यासकांचा मोठा सहभाग दिसून आला.योग शिष्टाचार -आसन, प्राणायाम आणि ध्यान-लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी केवळ पाच मिनिटांत ताजेतवाने, ताण कमी करण्यासाठी आणि कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात याविषयी तांत्रिक सत्रे घेण्यात आली.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनानिमित्त भारत सरकारच्यावतीने आयोजित,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण वर्षभर सुरु राहणार आहे. या महोत्सवाचे अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी, आयुष मंत्रालयाला 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर हा एका आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, आयुष राज्य मंत्री आणि अन्य चार केंद्रीय मंत्र्यांनी 1 सप्टेंबर रोजी विज्ञान भवनात एका शानदार समारंभात वाय – ब्रेक (Y-Break) मोबाईल अँप चा प्रारंभ केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: