बलात्कार व वाढते गुन्हे याबाबत कडक व ठोस कार्यवाही करा – अजित प्रकाश संचेती

पुणे ग्रामीण,पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर या भागात सध्या बलात्कार व वाढते गुन्हे याबाबत कडक व ठोस कार्यवाही करा – अजित प्रकाश संचेती,भारतीय राष्ट्रवादी पार्टी Take strict and concrete action against rape and increasing crime in Pune Rural, Pune City and Pimpri Chinchwad City – Ajit Sancheti

पुणे, दि 11/09/2021 – पुणे शहर,पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहर या मागील आठवड्यापासून बलात्कार व बाकीच्या गुन्हेगारीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे,अशा गुन्ह्या बाबत कडक कारवाई करण्यात यावी,पुणे शहर पोलीस आयुक्त ,ग्रामीण पोलीस अधीक्षक व पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त हे आल्यापासून बऱ्याच प्रमाणात गुन्हे कमी झाले होते.या सर्वांचा गुन्हेगारांवर वचक बसला होता.पण अलिकडील काळात हे गुन्हे वाढत चालले आहेत.

       असे वाटत आहे की या सर्व आयुक्तांच्या कामात किंवा त्यांच्या नियोजनामध्ये राजकीय दबाव तर येत नसेल ना ? या मागील आठवड्यात 4 ते 5 बलात्कार घटना घडल्या आहेत,जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यात लहान मुली असो किंवा महिला या रस्त्यावर किंवा घराबाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत अशी परिस्थिती राहिली तर महिलांना अवघड होऊन जाईल. यासाठी तिन्ही पोलीस आयुक्तांना यासाठी पूर्ण ताकत आणि अधिकार द्द्यावेत यामुळे अजून जास्त प्रमाणात याप्रकारचे गुन्हे घडणार नाहीत याबाबत योग्य ते नियोजन करावे असे निवेदन भारतीय राष्ट्वादी पार्टीचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख मंत्री अजित संचेती यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: