पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे : स्वीकृत सदस्यपदी लक्ष्मण शिरसाट,ॲड. सुनील वाळूजकर व सौरभ थिटे

पंढरपूर नगरपरिषदेच्या pandharpur Municipal Council उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे : स्वीकृत सदस्य म्हणून लक्ष्मण शिरसाट,ॲड.सुनील वाळूजकर व सौरभ थिटे यांची निवड

पंढरपूर नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न

पंढरपूर नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड करण्यात आली. तर स्वीकृत सदस्य म्हणून लक्ष्मण शिरसाट,ॲड.सुनील वाळूजकर व सौरभ थिटे यांची निवड झाली.

Pandharpur Municipal Council news: पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा आज उत्साहात पार पडली. या सभेमध्ये पंढरपूर–मंगळवेढा विकास आघाडीचे नगरसेवक महादेव धोत्रे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

याच सभेत स्वीकृत सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, ॲड.सुनील वाळूजकर आणि सौरभ थिटे यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे पंढरपूर नगर परिषदेच्या प्रशासनात अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समतोल साधला जाणार असल्याची चर्चा आहे.

निवडीनंतर माजी आमदार प्रशांत परिचारक आणि पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे तसेच नव्याने निवड झालेल्या स्वीकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी गटनेते भागवत बडवे,सुजित सर्वगोड,भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top