ऑनलाइन फसवणूक थांबवण्यासाठी येणार डिजिटल अरेस्ट कंट्रोल पॉलिसी; संशयास्पद कॉल-अ‍ॅप्सवर तात्काळ कारवाई

डिजिटल अरेस्ट DigitalArrest रोखण्यासाठी केंद्र सरकारची किल स्विच KillSwitch Policy योजना लवकरच : सायबर फसवणुकीवर मोठा आघात

ऑनलाइन फसवणूक थांबवण्यासाठी येणार डिजिटल अरेस्ट कंट्रोल पॉलिसी; संशयास्पद कॉल-अ‍ॅप्सवर तात्काळ कारवाई

New Delhi news: नवी दिल्ली – देशात वाढत चाललेल्या डिजिटल अरेस्ट DigitalArrest आणि सायबर फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार एक महत्त्वाची आणि क्रांतिकारी योजना राबवण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित धोरणाला डिजिटल किल स्विच पॉलिसी Kill Switch Policy असे संबोधले जात असून याअंतर्गत फसवणूक करणाऱ्या कॉल्स,अ‍ॅप्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स वर तात्काळ नियंत्रण मिळवता येणार आहे.

अलीकडच्या काळात अनेक नागरिकांना बनावट पोलिस, CBI,ED किंवा न्यायालयाच्या नावाने व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्ट केल्याचा भास निर्माण केला जात आहे.या मानसिक दबावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी किल स्विच प्रणाली लागू करण्याचा विचार सुरू केला आहे.

या प्रणालीद्वारे संशयास्पद मोबाइल नंबर,बनावट अ‍ॅप्स, फसवणूक करणारी सोशल मीडिया खाती,आर्थिक व्यवहारात वापरली जाणारी खाती यांना एका क्लिकवर बंद Deactivate करता येणार आहे.विशेष म्हणजे तक्रार नोंद होताच संबंधित डिजिटल माध्यम तात्काळ निष्क्रिय करण्याची क्षमता या धोरणात असणार आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते ही योजना लागू झाल्यास डिजिटल अरेस्टसारख्या फसवणुकीला मोठा आळा बसेल तसेच सामान्य नागरिकांचा डिजिटल व्यवहारां वरील विश्वास अधिक दृढ होईल.गृह मंत्रालय,आयटी मंत्रालय आणि दूरसंचार विभाग यांच्या समन्वयातून हे धोरण अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत.

केंद्र सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात असून ही योजना सायबर गुन्हेगारी विरोधातील निर्णायक पाऊल ठरणार आहे.

डिजिटल अरेस्ट DigitalArrest व सायबर फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकार आणणार किल स्विच पॉलिसी KillSwitchPolicy द्वारे संशयास्पद कॉल,अ‍ॅप्स आणि खात्यांवर तात्काळ कारवाई शक्य

Leave a Reply

Back To Top