माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात हिंदू धर्म रक्षण चर्चासत्राचे आयोजन: जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांचा पुढाकार

माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात हिंदू धर्म रक्षण चर्चासत्राचे आयोजन:जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांचा पुढाकार

माघ एकादशीनिमित्त संत जनार्दन स्वामी आश्रमात धर्म रक्षणावर विचारमंथन

माघ एकादशीनिमित्त पंढरपूर नजिक भटुंबरे येथे स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावतीने हिंदू धर्म रक्षण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

Pandharpur news:पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज :माघ एकादशीनिमित्त जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावतीने हिंदू धर्म रक्षण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दि.२९ रोजी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपूर नजिक भटुंबरे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकात असलेल्या संत जनार्दन स्वामी आश्रमात हे चर्चासत्र संपन्न होणार आहे.

या हिंदू धर्म रक्षण चर्चासत्रामध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यासह राज्यभरातून आलेले कीर्तनकार महाराज मंडळी उपस्थित राहणार असून हिंदू धर्माचे संरक्षण,धार्मिक मूल्ये,संस्कृती व परंपरा यासंदर्भात सखोल चर्चा केली जाणार आहे.

दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत सदर चर्चासत्र होणार असून भाविक,वारकरी तसेच धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन रामानंदजी महाराज यांनी केले आहे.

माघ एकादशीच्या पावन पर्वावर आयोजित या चर्चासत्रातून समाजात धर्मजागृती व सकारात्मक विचारांची दिशा मिळेल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Back To Top