RCB vs MI Preview: पराभवाची हॅट्रिक रोखण्यासाठी रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय; अशी असेल टीम मुंबई इंडियन्स


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज रविवारी होणारी दुसरी लढत भारताचा विद्यमान कर्णधार आणि भविष्यातील कर्णधार यांच्यात होणार आहे. अर्थात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स यांच्यात होय. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची आहे.

वाचा- CSK v KKR Playing XI: CSKची नजर प्लेऑफवर, धोनी संघात बदल करणार!

गुणतक्त्यात मुंबईचा संघ ९ सामन्यात ८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर बेंगळुरूचा संघ ९ सामन्यात १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आज मुंबईने विजय मिळवल्यास ते टॉप चार मध्ये पुन्हा येतील आणि जर बेंगळुरूने विजय मिळवल्यास त्याचे तिसरे स्थान आणखी भक्कम होईल. या दोन्ही संघांनी दुसऱ्या सत्रातील पहिल्या दोन लढती गमावल्या आहेत.

वाचा- Video: संघाबाहेर असलेल्या खेळाडूने घेतला सनसनाटी कॅच; होत आहे कौतुक

हार्दिक पंड्या खेळणार

मुंबई इंडियन्सचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे पहिल्या दोन लढती खेळू शकला नाही. तो संघात नसल्यामुळे संघाचे संतुलन बिघडल्याचे दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक फिट झाला असून तो आजच्या सामन्यात खेळणार असल्याचे कळते.

सूर्यकुमार आणि इशानची खराब कामगिरी

गेल्या वर्षी मुंबईने आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते. तेव्हा सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचे मोठे योगदान होते. हे दोन्ही फलंदाज पहिल्या चेंडूपासून पॉवर हिटिंगसाठी ओळखले जातात. गेल्या दोन डावात इशानने ११ आणि १४ तर सूर्यने ३ आणि ५ धावा केल्या आहेत. यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या करता आली नाही.

वाचा- भारताचा माजी विकेटकीपर पार्थिव पटेलच्या वडिलांचे निधन, क्रिकेटपटू म्हणाला…

एबीकडून चांगली कामगिरी

आरसीबीसाठी विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल हे चांगली सुरूवात करून देत आहेत. पण मधल्या फळीत एबी डिव्हिलियर्सकडून अधिक योगदानाची गरज आहे. या सामन्यात विराटला टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. याासठी त्याला १३ धावांची गरज आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरेल.

मुंबईचा संभाव्य संघ-
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या किंवा सौरभ तिवारी, क्रुणाल पंड्या किंवा अनुकुल रॉय, ट्रेंट बोल्ट, एडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर

आरसीबीचा संभाव्य संघ-
विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, टीम डेव्हिड, वानिदु हसरंगा किंवा कायले जेमीसन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराजSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: