Explainer : मुंबई इंडियन्सला झालय तरी काय? यांच्यामुळे होतोय पराभव


मुंबई: आयपीएलची ५ विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला झाले तरी काय असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे. आयपीएलचा १४वा हंगाम सुरू झाला तेव्हा मुंबई इंडियन्सचा पराभव कोण करू शकणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण स्पर्धा जसजशी पुढे जाऊ लागली तश तशी मुंबईची कामगिरी खराब झाली. मुंबई इंडियन्सच्या बाबत नेहमीच असे म्हटले जाते की त्यांची सुरुवात धीमी होते आणि नंतर एकदा गाडी सुटली की ती थेट जेतेपदाला जाऊन थांबते. यावेळी असे काय झालेय की मुंबईची गाडी अजून रुळावर आलेली नाही. जाणून घेऊयात…

वाचा- Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे का? जाणून घ्या

आयपीएल २०२१ मध्ये मुंबईने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त ४ मध्ये विजय मिळवता आलाय. हे चारही विजय पहिल्या सत्रात म्हणजे भारतात झालेल्या सामन्यात विजय मिळवला होता. युएईमध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या सत्रात मुंबईला अजून एकही विजय मिळवता आले नाही. गेल्या दोन हंगामात विजय मिळवण्याऱ्या मुंबई इंडियन्स संघात असा काय बदल झालाय ज्यामुळे ते गुणतक्त्यात सातव्या क्रमांकावर फेकले गेले.

वाचा- CSKकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूची तडकाफडकी कसोटीतून निवृत्ती

मुंबईला सलामीच्या फलंदाजांकडून चांगली सुरुवात मिळत आहे. मुंबईचे गोलंदाज देखील शानदार कामगिरी करत आहेत. असे असताना मुंबईचे कुठे चुकत आहे. आयपीएलच्या या हंगामात मुंबईची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे ती मधळी फळी. ज्यामुळे मुंबईने गेल्या दोन हंगामात विजेतेपद मिळवले ती मधळी फळीत यावेळी अपयशी ठरत आहे.

वाचा- IPL 2021 Points Table: विश्वास बसणार नाही; मुंबई इंडियन्ससोबत २०१८ नंतर

रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांच्यानंतर येणारे सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पंड्या हे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरत आहेत. या सर्व फलंदाजांची कामगिरीवर एक नजर टाकूयात

वाचा- Harshal Patel Hattrick Video: मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिक घेणारा हर्षल पटेल

इशान किशन- ८ सामने, १०७ धावा, सर्वोत्तम- २८
सूर्यकुमार यादव- १० सामने, १८९ धावा, सर्वोत्तम ५६
कायरन पोलार्ड- १० सामने, २११ धावा, सर्वोत्तम-८७
हार्दिक पंड्या- ८ सामने, ५५ धावा, सर्वोत्तम- १६
क्रुणाल पंड्या- १० सामने, १२१ धावा, सर्वोत्तम- ३९

यातील क्रुणाल पंड्या वगळता अन्य सर्व खेळाडूंकडून मधळ्या षटकात मोठी खेळी झाली नाही. यामुळेच मुंबई इंडियन्सची गाडी अद्याप रुळावर आलेली नाही. इशानने गेल्या हंगामातील १४ डावात ५१६ धावा केल्या होत्या. सूर्यकुमारने १६ सामन्यात ४८० धावा केल्या होत्या.

कर्णधार रोहित शर्माने ९ सामन्यात ३२६ , डीकॉकने ९ सामन्यात २५१ धावा केल्या आहेत. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूमध्ये मुंबईचा एकही खेळाडू नाही. रोहित आठव्या स्थानावर आहे. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट या जोडीची दहशत कायम आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १४ विकेट घेतल्या आहेत. तर बोल्टने ११ आणि राहुल चाहरने १२ विकेट मिळवल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: