Video: खराब फॉर्ममुळे निराश झालेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाच्या मदतीला आला विराट


मुंबई: आयपीएलचा १४वा हंगाम संपल्यानंतर टी-२० वर्ल्डकप सुरू होणार आहे. यामुळेच भारतीय खेळाडू आयपीएलकडे टी-२० वर्ल्डकपची तयारी म्हणून पाहत आहे. आयपीएल खेळणारे अनेक खेळाडू भारताकडून टी-२० वर्ल्डकप खेळणार आहेत. मुंबई इंडियन्स संघातील ६ खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. पण भारतीय संघाला वर्ल्डकपचा आधी मोठा झटका बसला आहे. कारण या सहा पैकी तीन खेळाडूंचा फॉर्म प्रचंड खराब आहे. यात इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे.

वाचा- मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे का? जाणून घ्या

मुंबईकडून खेळणारे हार्दिक आणि इशान यांना आयपीएलच्या या हंगामात काही खास करता आले नाही. काल रविवारी झालेल्या सामन्यात इशान किशन फक्त ९ धावा करू शकला. तर हार्दिक ३ आणि सूर्यकुमार ८ धावांवर बाद झाले. याचा कामगिरी पाहून चाहते देखील नाराज झाले.

वाचा- Explainer : मुंबई इंडियन्सला झालय तरी काय? यांच्यामुळे होतोय पराभव

आरसीबीने मुंबईचा ५४ धावांनी पराभव केल्यानंतर इशान किशन फार नाराज दिसत होता. सामना झाल्यानंतर भारताचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये आरसीबीचे नेतृत्व करणारा विराट कोहली त्याच्या जवळ गेला आणि काही गोष्टी समजावून सांगू लागला. विराटने इशानला काय सांगितले हे कळू शकले नाही. पण विराट इशानचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत होता असे दिसते.

वाचा- विश्वास बसणार नाही; मुंबई इंडियन्ससोबत २०१८ नंतर प्रथमच असे झाले

वाचा- Video: मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिक घेणारा हर्षल पटेल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विराटच्या या कामाचे अनेक जण कौतुक करत आहेत. वर्ल्डकपमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची कामगिरी विराटसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळेच त्याचा प्रयत्न आहे की हे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये यावेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: