प्रेमविवाह केला तरी पत्नीबाबत माहिती नव्हती ‘ही’ गोष्ट; पतीने घेतला मोठा निर्णय!


लंडन: एका तरुणाचा जीव एका तरुणीवर जडला. दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या आणि दोघांमध्ये प्रेम झालं. त्यानंतर दोघेही विवाहबंधनात अडकले. मात्र, एके दिवशी पत्नीबाबत वेगळीच माहिती समजल्याने या तरुणाला धक्काच बसला. आपली पत्नी याआधी एक पॉर्नस्टार असल्याचे तरुणाला समजले. त्याशिवाय, तिच्याबाबत इतरही काही गोष्टी समोर आल्यात.

प्रेमविवाह झालेल्या जोडप्यांना एकमेकांची गुपिते माहित असतात. मात्र, या नात्यामध्ये काही गोष्टी समोर आल्याच नाहीत. ब्रिटनमधील ही घटना आहे. ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाचे नाव जोस असून तो २६ वर्षांचा आहे. तर, त्याची पत्नी ३४ वर्षांची आहे. या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. दोघांचे वैवाहिक आयु्ष्य सुरळीत सुरू होते. अचानक एकेदिवशी जोसला आपल्या पत्नीच्या पूर्वइतिहासाबाबत कळले आणि त्याला धक्का बसला. त्याची पत्नी याआधी पॉर्न स्टार असल्याचे समजले. मात्र, ही माहितीची पडताळणी त्याने सुरू केली होती.

ऑफिसमध्ये मुलींना हनी, स्वीटी बोलणं पडलं महागात; कंपनीने केली ‘ही’ कारवाई
डेली मेलच्या वृत्तानुसार, त्याची पत्नी दुसऱ्याच नावाने काही वर्ष पॉर्न इंडस्ट्रीत काम करत होती. तिने काही पॉर्न चित्रपटात कामही केले होते. पत्नीबाबत ही माहिती समजताच जोसला धक्का बसला.

हे कसं शक्य आहे? इंग्लंडमध्ये सांगलीच्या बाळू लोखंडेची लोखंडी खुर्ची!
जोसने ही बाब आपल्या काही मित्रांना सांगितले. मात्र, मित्रांनी त्याला धीर देत जुन्या गोष्टींवर विचार न करण्यास सांगितले. प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो आणि तिने आयुष्याची नवीन सुरुवात केली असल्याचे जोसच्या मित्रांनी सांगितले. जोसच्या मित्रांनी त्याची समजूत काढली. जोसनेही आपल्या पत्नीबद्दल कोणताही आकस मनात ठेवला नाही. सध्या दोघेही एकत्र राहत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: