पंकजा मुंडे यांना धक्का; कारखान्याच्या उपाध्यक्षांसह ५ संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश


हायलाइट्स:

  • पंकजा मुंडे यांना परळी तालुक्यात मोठा धक्का
  • बड्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

बीड :भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना परळी तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. कारण परळीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह ५ संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित होते.

‘आज या प्रवेशामुळे संघटनेला आणि आम्हाला बळ मिळणार आहे. सर्वांचे स्वागत,’ अशी प्रतिक्रिया या प्रवेश सोहळ्यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

धनंजय मुंडे यावेळी म्हणाले की, “२०१२ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माझा दारुण पराभव झाला. आज परळी पंचायत समिती, परळी मार्केट कमिटी आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मातीतल्या माणसांनी मला पाठिंबा दिल्यामुळेच हे यश मिळवता आले.”

Highway Repair Work: महामार्गांची दुरुस्ती १५ ऑक्टोबरपूर्वी; कोकणात ‘ते’ अधिकारी मुक्काम ठोकणार!

जयंत पाटलांची भाजपवर टीका

या कार्यक्रमात भाजपवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांना थोडा फायदा मिळू लागला तर भाजपच्या पोटात दुखतं. महागाई वाढवून सामान्य लोकांना वेठीस धरले जात आहे. दिल्लीत सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आलिशान घर बांधले जात आहे, याची देशाला खरंच गरज आहे का?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडत असून शेतीमालाचे मोठे नुकसान झालं आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासन नुकसान भरपाई देण्याची सगळी व्यवस्था करेल, अशा शब्दात जयंत पाटील यांनी परळी येथे बोलताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: