धक्कादायक: पुण्यात २ आंतरराष्ट्रीय बुकींना बेड्या; बेटिंगचा पैसा हवालात!


हायलाइट्स:

  • पुण्यात दोन आंतरराष्ट्रीय बुकींना अटक.
  • ‘आयपीएल’ सामन्यांवर घेत होते सट्टा.
  • पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड.

पुणे:आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय बुकींना अटक केल्यानंतर बेटिंगचा मोठा बाजार समोर आला आहे. बेटिंगमधून आलेला पैसा हवाला रॅकेट व सोन्याच्या देवाणघेवाणीचे व्यवहारासाठी केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दोन बुकींच्या संपर्कात असलेले बुकी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. ( IPL Betting Racket Busted In Pune )

वाचा: पुलावरील खड्ड्यांनी घेतला मायलेकाचा बळी; आई वडिलांना भेटायला जाताना…

गणेश भिवराज भुतडा (वय ५०, रा. त्रिमूर्ती सोसायटी, रस्ता पेठ) आणि अशोक भवरलाल जैन (वय ४६, रा. हाईड पार्क, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांच्या विरुद्ध समर्थ व मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडून ९३ लाख ४२ हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे. यातील ९२ लाखांची रोकड भुतडाकडे मिळाली आहे. भुतड याचा कंन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तर, जैन याचा इलेक्ट्रीकचा व्यवसाय आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना बेटींगबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. दुबई येथील आबुधाबीमध्ये सुरू असलेल्या चेन्नई सूपर किंग आणि कोलकत्ता नाईट राईडर्स यांच्यातील आयपीएल मॅचवर हे दोघे बेटींग घेत होते. पथकाने रास्ता पेठ व मार्केटयार्ड येथे एकाचवेळी ही कारवाई केली. हे दोघे बुकी क्रिकेट लाइन गुरु, बेटवेअर, क्रिकेट एक्सचेंज या अॅपव्दारे मोठ्या प्रमाणावर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले.

वाचा: मंत्रिमंडळाची बैठक ‘डेक्कन ओडिसी’त!; मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले…

सहा महिन्यापासून पोलिस होते पाळतीवर

गेल्या सहा महिन्यांपासून पुणे पोलिस आरोपींच्या मागावर होते. यापूर्वीच्या आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष्य होते. मात्र, आयपीएलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याचे स्पर्धा अचानक स्थगित झाली होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई थांबविली. आता पुन्हा आयपीएल सुरू झाल्यानंतर सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून बेटींगचा मोठा बाजार समोर आला आहे. बेटींगमधून हवाला रॅकेट व सोन्याच्या देवाण-घेवानीचे व्यवहार झाल्याचे समोर येत आहे. जैन हा अनेक वर्षापासून क्रिकेट बेटिंग घेत असून आतापर्यंत तो कधी पोलिसांच्या रडारवर आला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करण्यास सुरूवात केली आहे. या दोघांकडे सापडलेल्या मोबाइलमध्ये त्यांच्याकडे बेटिंग करणारे आणि त्यांच्याकडून पुढे बेटिंग घेणारे अशा अनेकांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता असून त्यातून मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

वाचा: मुख्यमंत्र्यांपुढं आमचं काही चालत नाही!; अजित पवारांचं मोठं विधानSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: