सोने-चांदी गडगडले ; सहा महिन्यांतील सर्वात कमी दरात मिळतंय सोने, जाणून घ्या भाव


हायलाइट्स:

  • आज मंगळवारी सोने आणि चांदीवर नफावसुलीचा दबाव दिसून आला.
  • आज सोने दरात १४९ रुपयांची घसरण झाली. सोने दर ४५९२० रुपयांपर्यंत खाली घसरला.
  • मागील सहा महिन्यातील सोन्याचा हा नीचांकी स्तर आहे.

मुंबई : कमॉडिटी बाजारात आज मंगळवारी सोने आणि चांदीवर नफावसुलीचा दबाव दिसून आला. आज सोने दरात १४९ रुपयांची घसरण झाली असून प्रती १० ग्रॅमचा भाव ४५९२० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. मागील सहा महिन्यातील सोन्याचा हा नीचांकी स्तर आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीत देखील २५९ रुपयांची घसरण झाली आहे.

आभासी चलने तेजीत ; बिटकॉइनसहा या डिजिटल करन्सीच्या किमतीत झाली वाढ
याआधी सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली होती. काल एमसीएक्सवर बाजार बंद होताना सोन्याचा भाव पुन्हा ४६०७१ वर स्थिरावला. त्यात ७६ रुपयांची वाढ झाली. तर चांदी ६५० रुपयांनी वधारून ६०६०५ रुपयांवर बंद झाली.

पेट्रोल-डिझेलचा भडका ;पेट्रोलियम कंपन्यांच्या दरवाढीने देशभरात इंधन महागले
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४५९३० रुपये आहे. त्यात १३९ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४५९२० रुपयांपर्यंत खाली गेला होता. एक किलो चांदीचा भाव ६०४७० रुपये आहे. त्यात १६४ रुपयांची घसरण झाली आहे. त्याआधी चांदीने ६०३३९ रुपयांची नीच्चांकी पातळी गाठली होती.

उच्च परतावा आणि कमी जोखीम ; सॅमको एसेट मॅनेजमेंटने सुरु केली पहिल्यांदाच ही सुविधा
Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५२९० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४६२९० रुपये झाला. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५०० रुपयांवर स्थिर आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९६४० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३५५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७५१० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५७६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८४६० रुपयांवर स्थिर आहे.

पडझड थांबली ; जाणून घ्या आज सोने-चांदी किती रुपयांनी महागले
जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्ड ०.१ टक्क्यांहून अधिक घसरून प्रति औंस १७४७.९९ डॉलरपर्यंत खाली आले आहे. दुसऱ्या बाजूला चांदीमध्ये मात्र तेजी दिसून आली. चांदीचा भाव ०.६ टक्क्यांनी वधारून २२.५५ डॉलर प्रती औंस झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: