सोनिया बॉयफ्रेंडच्या प्रेमत अंधळी झाली होती…पण तिने त्याची हत्या केली…


गुरुग्रामः पोलिसांनी एक महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. या महिलेने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप आहे. कोर्टात हजर केल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी ही हत्येची घटना घडली होती.

हत्या झालेल्या व्यक्तीचं नावं आसिफ होतं, तो २५ वर्षांचा होता. आसिफ हा उत्तर प्रदेशातील बदायूंचा राहणार होता आणि तो रिक्षा चालक होता. आसिफ आणि २६ वर्षीय आरोपी महिला सोनिया हिचे प्रेम संबंध होते. जवळपास तीन वर्षांपासून त्यांचे हे प्रेम संबंध होते. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे संबंध बिघडले आणि आसिफला हे रिलेशनशिप तोडायची होती. कराण त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यासाठी मुलगी बघितली होती आणि तो तिच्याशी लग्न करणार होता.

आसिफ आपल्याला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करणार अल्याने सोनिया संतापली होती. ती पंजाबमधील जालंधर येथून आपला याकूब (वय २४) साथीदार याला घेऊन गुरुग्राममध्ये आली. याकूबच्या मदतीने तिने आसिफची हत्या केली. दोघांनी आसिफला बोलण्यासाठी घाटा गावाच्या बाहेर एका निर्मनुष्य ठिकाणी बोलावलं. या ठिकाणी आसिफवर लोखंडी सळईने हल्ला केला गेला आणि यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केली गेली, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रीत पाल संगवान यांनी दिली.

आसिफला सोनियाशी असलेले प्रेम संबंध तोडायचे होते. यामुळे सोनिया प्रचंड खवळली होती. तिने आसिफची हत्या करण्यासाठी याकूबची मदत घेतली. हत्येसाठी ती जालंधवरून गुरुग्राममध्ये पोहोचली, असं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.

आसिफच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मध्ये गुन्हा नोंदवला. एका व्यक्तीचा घाटा गावाच्या बाहेर मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सोनिया आणि याकूब हे दोन्हीही बदायूंचे रहिवासी आहेत. त्यांना सोमवारी अटक करण्यात आली. पुढे जाऊन आसिफमुळे आपल्या जीवाला धोका असेल, अशी भीती सोनियाला होती. तसंच आसिफकडे तिचे इंटिमेट फोटो आणि व्हिडिओही होते, असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. दोघांनी चौकशी केल्यानंतर हत्येसाठी वारण्यात आलेला लोखंडी रॉड आणि दगड पोलिसांनी जप्त केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: