महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व सामान्य पूरग्रस्तांना पंचनाम्याशिवाय तात्काळ 50000 रु मदत द्यावी – अजित संचेती

महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व सामान्य पूरग्रस्तांना पंचनाम्याशिवाय तात्काळ 50000 रु मदत द्यावी – अजित संचेती
        पुणे ,30/09/2021 / डॉ अंकिता शहा - अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी सामान्य नागरिकांचे खूप नुकसान झालेले आहे. याआधीच सलग सुमारे दिड वर्ष झाले कोरोनासारख्या महामारीमुळे अजूनही अनेकजण आर्थिक नुकसानीमधून सावरलेले नाहीत,त्यात ह्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे व काही जणांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.यात पुरासारख्या परिस्थिती मुळे काही जणांना आपला जीव गमवावा लागला  आहे. त्यांच्या परिवाराला तात्काळ मदत द्यावी, पंचनामेनंतर करावेत पहिले त्यांना तातडीने मदत द्यावी व लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टी ही रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. 

         पंचनाम्याशिवाय तात्काळ मदत द्यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राज्य संपर्क प्रमुख अजित संचेती यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: