‘या’ ४ स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक; अल्पावधीतच व्हाल मालामाल, या ब्रोकरचा अंदाज


हायलाइट्स:

  • शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक सध्या विक्रमी पातळीवर आहे.
  • अॅक्सिस सिक्युरिटीजने काही शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
  • सणासुदीच्या काळात या कंपन्यांच्या उत्पादनांची मागणी वाढेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : शेअर बाजार सध्या विक्रमी पातळीवर आहे. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमधे त्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. बहुतेक शेअर्स सध्या त्यांच्या उच्चांकी स्तरावर आहेत आणि त्यापैकी बऱ्याच शेअर्सनी त्यांचे याआधीचे विक्रम मोडीत काढले आहेत. अशा स्थितीत सण-उत्सवांचा काळ लक्षात घेत अॅक्सिस सिक्युरिटीजने काही शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सणासुदीच्या काळात या कंपन्यांच्या उत्पादनांची मागणी वाढेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

एअर इंडियाच्या पंखांना टाटांचे बळ; तब्बल ६८ वर्षानंतर एअर इंडिया स्वगृही परतणार
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड :
अॅक्सिस सिक्युरिटीजने हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांने या शेअरसाठी टार्गेट प्राइसमध्ये सुधारणा करत ३१०० रुपये केली आहे. सुरुवातीला हा अंदाज २६७० रुपये होता. गुरुवारी हा शेअर २७०१ रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

हाॅलिडेला जाताय ; ऐन सुटीच्या हंगामात विमान प्रवास महागणार,हे आहे त्यामागचे कारण
हिरो मोटोकॉर्प :
दुचाकींमधील नामांकित कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पचे वर्चस्व अजूनही अबाधित आहे. स्कूटर आणि एंट्री लेव्हल बाईकमध्ये त्यांच्या उत्पादनांची प्रचंड विक्री होते. अॅक्सिस सिक्युरिटीजने यासाठी प्रति शेअर ३४०० रुपये टार्गेट प्राइस ठेवली आहे. गुरुवारी हा शेअर २८३२ रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

IPO ठरला जबरदस्त हिट ; ‘पारस डिफेन्स’च्या शेअरने केलं गुंतवणूकदारांना मालामाल
एसबीआय कार्ड्स :
अॅक्सिस सिक्युरिटीजने म्हटले आहे की, दीर्घ कालावधीत एसबीआय कार्ड्सची वाढ खूप चांगली दिसत आहे. त्यांचा बाजारातील हिस्साही सातत्याने वाढत आहे. एचडीएफसी बँकेवर नवीन क्रेडिट कार्ड प्रसिद्ध करण्यावर बंदी घातल्यानंतर त्याचा मोठा फायदा एसबीआयला झाला. पण, आता एचडीएफसी बँकेवरील हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. या शेअरसाठी १२१० रुपयांचे नवीन टार्गेट प्राइस देण्यात आली आहे. गुरुवारी शेअर १०३० रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वर्षाला ६००० नाही, तर ३६००० रुपये मिळतील, असा करा अर्ज
रिलॅक्सो फूटवेअर :
पादत्राणांमधील हा एक चांगला ब्रँड आहे, ज्यामध्ये खूप चांगला ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे. मालमत्तेची गुणवत्ता चांगली आहे आणि कंपनीची कामगिरी सातत्याने सुधारली आहे. या शेअरची टार्गेट प्राइस १२९० रुपये ठेवण्यात आली आहे. गुरुवारी हा शेअर ११४१ रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीवर आधारित आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजारच्या अटी आणि शर्ती व्यवस्थित वाचा. हा लेख वाचकांच्या माहितीसाठी आहे. या माहितीच्या आधारे गुंतवलेल्या पैशावर नुकसान किंवा फायदा झाल्यास यास महाराष्ट्र टाईम्सडाॅटकाॅम जबाबदार नाही.)Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: