भालके शांत अभ्यासिकेची दत्तात्रय भालके (अव्वर सचिव म.शासन) यांनी केली पाहणी

ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा 1 मे 2024 रोजी सरकोली पर्यटन स्थळ येथे भरणार

सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्यातील सरकोली पर्यटन स्थळ निर्मिती स्मृतीशेष ज्ञानेश्वर भालके व स्मृतीशेष तुकाराम भालके शांत अभ्यासिका निर्माणासाठी 2 लाख रुपये मदत केलेले दत्तात्रय सुर्यकांत भालके (अव्वर सचिव म. शासन) यांनी अभ्यासिकेवर टाकलेल्या काॅंक्रीट स्लॅपची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.त्यांनी या पुढील कामासाठी आर्थिक नियोजन करणार असल्याचेही सांगितले.

मुळचे सरकोली गावचे रहिवासी असलेले प्रा सदानंद डिंगरे सर,ह.भ.प.सूर्याजी भोसले, विकास देशमुख,रमेश भोसले, दिलीप कराळे, हणमंत भोसले सर सरकोली,मोहन क्षीरसागर ओझेवाडी यांनीही भेट दिली. तसेच सुनील भोसले यांनी पर्यटन स्थळ श्री भैरवनाथ मंदीर समोर शौचालयाचे कामासाठी आश्वासन दिले आहे.

माऊली ज्वेलर्स सरकोली चे ज्ञानदेव घुले रा.इंचगाव यांनी सरकोली पर्यटन स्थळ निर्मातीस 35000/₹ चे 100 पोती सिमेंट दिले तर पर्यटन कामात लागणारे सिमेंटही होलसेल रेटने देण्याचे आश्वासन दिले आहे.

सरकोली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा 1 मे 2024 रोजी सरकोली पर्यटन स्थळ येथे भरत आहे.यात्रेच्या तयारी साठी गावकरी बंधूंनी प्रयत्न सुरू केले असल्याचे माजी पोलीस अंमलदार विलास श्रीरंग भोसले यांनी सांगितले.संपर्कासाठी – 9923433535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *