राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटक सचिवपदी आटपाडीचे रावसाहेबकाका पाटील

राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटक सचिवपदी आटपाडीचे रावसाहेबकाका पाटील

आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज – आटपाडी तालुक्याचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

इस्लामपूर येथील राजारामबापू सह साखर कारखान्यावर त्यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बापू पाटील,प्रदेश कार्यकारिणी सदस्य हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादी सोशल मिडीया तालुका प्रमुख किशोर गायकवाड, युवक सरचिटणीस नितीन डांगे, युवक तालुका प्रशांत मोटे हे उपस्थित होते .

१९९२ साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या रावसाहेबकाका पाटील यांनी १९९९ साली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

गेली पाच दशके सतत कार्यरत असणाऱ्या रावसाहेबकाका पाटील यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी देऊन आमदार जयंत पाटील यांनी त्यांचा मोठा गौरव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *