वन्यप्राण्याची शिकार करून फरार मुख्य आरोपीला पंढरपूर शहर पोलीसांनी केले गजाआड

काळवीट या वन्यप्राण्याची शिकार करून दोन महिन्यांपासून फरार मुख्य आरोपीला पंढरपूर शहर पोलीसांनी केले गजाआड

पंढरपूर /नागेश आदापुरे – दि ०१/१०/२०२१ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज ता.उत्तर सोलापूर यांना गोपनिय सुत्रांमार्फत माहीती मिळाली की , माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज यांच्या कार्यालयाकडील दि २१/०७/२०२१ रोजी दाखल असलेल्या गुन्हया तील मुख्य फरारी आरोपी समीर रवी चव्हाण वय २८ वर्ष ,रा गंगेवाडी जि उस्मानाबाद हा गुन्हा घडल्यापासून फरार असून सध्या पंढरपूर शहराच्या आजूबाजूला नातेवाईकांचा सहारा घेवून राहत आहे . अशी माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी नान्नज श्रीमती शुभांगी जावळे यांनी तात्काळ पंढरपूर शहर पोलीस स्टेशनकडे आरोपीला पकडण्यासाठी मागितली . त्यानुसार पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण पवार यांनी तात्काळ सदर आरोपीला पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत,पोहवा राजेश गोसावी , पोना इरफान शेख , पोशि निलेश कांबळे यांचे एक पथक तयार केले.त्यानुसार पोलीस तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंढरपूर शहरात आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांची चाहुल लागताच आरोपीने पंढरपूर मधून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांनी तांत्रिक विश्लेषनाचे आधारे कॉलेज काँस चौक येथे सापळा रचला असता सदर ठिकाणी आरोपी येताच त्याला पोलीसांनी ताब्यात घेवून विचारपुस केली असता . आरोपीने दि.२१/०७/ २०२१ रोजी माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज च्या हद्दीतील गंगेवाडी या गावाच्या शिवारात काळविट या वन्यप्राण्याची शिकार केली होती . काळविटाची शिकार करून त्याचे घरी काळविटाचे मांस विकी करत असल्याची माहीती वनविभागाला मिळताच आरोपी हा तेथुन फरार झाला होता.

 सदर आरोपीला शोधण्यासाठी गेली दोन महीने वनविभागाचे पथक हे उस्मानाबाद , सोलापूर जिल्हयात फिरत होते .मागील महिन्यात मौजा केशेगाव ता तुळजापुर जि उस्माबाद येथे सदर आरोपी हा लपून बसल्याचे वनविभागाला माहीत झाल्यावर वनविभागाचे पथक तेथे पोहताच आरोपी हा तेथुन फरार होउन पंढरपूर येथे आला होता.पंढरपूर येथे आल्यावर तो आजूबाजूच्या नातेवाईक यांचेकडे राहण्यासाठी आसरा घेत असल्याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी यावेळी प्रथम पंढरपूर पोलीस स्टेशनकडे पोलीस मदत मागितली त्यामुळे यावेळी फरार आरोपीला पकडण्यात माहीर असलेले पोलीसांची साथ वनविभागाला मिळाल्याने पोलीसांनी तांत्रिक विश्लेषन व आपले कौशल्याचे आधारावर आरोपीला ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही करीता वनपरीक्षेत्र अधिकारी नान्नज ता.उत्तर सोलापूर श्रीमती शुभांगी जावळे यांचेकडे सुपूर्त केले . 

    सदरची कामगिरी ही उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण पवार पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत,पोहवा राजेश गोसावी,पोना इरफान शेख, पोशि निलेश कांबळे यांनी पार पाडली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: