झेडपी, पंचायत समिती निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीबाबत जयंत पाटलांचे मोठे विधान


हायलाइट्स:

  • जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर
  • सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून यशाचे दावे
  • जयंत पाटील यांचं महाविकास आघाडीबाबत मोठं विधान

मुंबई: राज्यात काल झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. निकाल जाहीर होताच प्रत्येक पक्ष यशाचा दावा करू लागला आहे. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजपनं प्रचार सुरू केला आहे. त्याचवेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निकालानंतर अत्यंत मोठं विधान केलं आहे. (Jayant Patil on ZP, Panchayat Samiti Election Results)

‘जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालांतून महाविकास आघाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ८५ पैकी जवळपास ४८ जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या आहेत. त्यातील १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीनं केलेल्या कामाच्या सोबत जनता असल्याचं दिसून आलं आहे,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.

वाचा: एकनाथ खडसे अडकतच चाललेत; आता ‘या’ प्रकरणी चौकशीची मागणी

‘भाजपच्या विचारांना जनतेनं नाकारलं आहे हे या निकालामधून दिसतं. यापुढील निवडणुकांमध्ये देखील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनंच लागेल,’ असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणतात…

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला तरीही मतदारांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात सत्तेवर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता व आज भाजप विरोधी पक्षात असूनही तोच ट्रेंड आज कायम राहिला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचा: महाराष्ट्रात असा प्रकार कदाचित पहिल्यांदा घडला असेल! पाहा काय झालं?

‘राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं युती करून पूर्ण बहुमतानं विजय मिळविला. त्यानंतर विरोधी पक्षात बसावं लागलं तरीही भाजपला जनतेचा पाठिंबा कायम आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळाला. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आगामी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकतही भाजपा विजयी होईल, असा विश्वास पाटील यांनी बोलून दाखवला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: