वाईट बातमी: टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारताला बसला मोठा धक्का; हा खेळाडू झाला जखमी


नवी दिल्ली: आयसीसी टी-२० वर्ल्डकपला येत्या १७ ऑक्टोबरपासून युएईमध्ये सुरुवात होत आहे. भारतीय क्रिकेट संघ २४ ऑक्टोबर रोजी वर्ल्डकपमधील पहिली मॅच खेळणार आहे. ही मॅच पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. आयपीएलच्या माध्यमातून वर्ल्डकपची तयारी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

वाचा- धोनीच्या निवृत्तीवर CSK ने दिलं मोठं अपडेट; वाचा सविस्तर बातमी

वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड झालेल्या आणि सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीच्या गुढघ्याच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोकवर काढले आहे. वरुण चक्रवर्ती हा भारताचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. पण आता बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमला या फिरकीपटूच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण तो पूर्णपणे फिट नाही. आयसीसीच्या नियमानुसार भारताला १० ऑक्टोबरपर्यंत संघ बदलता येऊ शकतो. पण गुढघ्याच्या दुखापतीनंतर देखील वरुण भारतीय संघात असण्याची दाट शक्यता आहे.

वाचा- रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या विजयाबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाला, ठरवूनच जिंकलो !

बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुणच्या गुढघ्याचे दुखणे फार गंभीर आहे. त्याला प्रचंड त्रास होतोय. पण जर टी-२० वर्ल्डकप नसता तर भारतीय संघ व्यवस्थापनाने हा धोका पत्करला नसता. सध्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने त्याचा त्रास कमी करण्याचा आहे. त्यानंतर त्याच्या रिहॅबच्या दृष्टीने विचार केला जाईल.

वाचा- चक दे इंडिया! FIHच्या सर्व पुरस्कारांवर भारतीय हॉकी खेळाडूंनी कोरलं नाव

केकेआरच्या सपोर्ट स्टाफने वरुणसाठी सविस्तरपणे फिटनेस कार्यक्रम केला आहे. त्याला त्रास होऊ नये म्हणून इंजेक्शन दिले जात आहे. जेणेकरून तो चार षटके गोलंदाजी करू शकतील. इंजेक्शनमुळे तो जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा त्याला त्रास होत नाही. वरुणने आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत १३ लढतीत १५ विकेट घेतल्या आहेत. भारताकडून त्याने ३ टी-२० सामने खेळले असून त्यात त्याने दोन विकेट घेतल्या आहेत.

भारताने २००७ नंतर एकही टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत विजेतेपद मिळवेल अशी अशा आहे. भारतीय संघाच्या मदतीसाठी बीसीसीआयने एमएस धोनीची मदत घेणार आहे. धोनीचा समावेश मार्गदर्शक म्हणून करण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: