MI vs SRH Preview : मुंबई इंडियन्सची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची ही असेल रणनिती असेल, पाहा…


आबुधाबी : मुंबई इंडियन्ससाठी शुक्रवारी होणारा सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना हा करो या मरो, असाच असणार आहे. कारण हा सामना जर मुंबई इंडियन्सने गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने खास रणनिती आखली असेल.

प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई काय रणनिती वापरणार पाहा…
मुंबई इंडियन्सच्या संघासाठी हैदराबादचा सामना सर्वात महत्वाचा असेल. कारण मुंबई इंडियन्सचे सर्वस्व पणाला लागलेले असेल. त्यामुळे मुंबई इंडियन्स या सामन्यात प्रथम गोलंदाजी करायला प्रधान्य देईल. कारण मुंबई इंडियन्सचे गोलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी अचूक आणि भेदक मारा करत त्यांना शतकाची चवेसही ओलांडू दिली नव्हती, त्यामुळे अशीच कामगिरी मुंबई इंडियन्सला करावी लागणार आहे. कारण मुंबई इंडियन्सला ११ षटकांमध्ये हैदराबादचे आव्हान पूर्ण करावे लागले तर त्यांच्यासाठी प्रथम गोलंदाजी करणे महत्वाचे असेल. त्याचबरोबर टार्गेट समोर असल्यावर मुंबईचा संघ चांगली कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे शुक्रवारच्या महत्वाच्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करून हैदराबादला कमी धावसंख्येत रोखायचे आणि त्यांचे आव्हान कमीत कमी षटकांत पूर्ण करायचे, हीच रणनिती मुंबई इंडियन्ससाठी फायदेशीर ठरेल. कारण प्रथम फलंदाजी केल्यावर मुंबईला जर मोठी धावसंख्या उभारता आली नाही तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात प्रथम गोलंदाजी मुंबई इंडियन्ससाठी हिताची ठरू शकते. त्यामुळे आता सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

मुंबई इंडियन्सची मधली फळी अजूनही चांगल्या फॉर्मात दिसत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे पहिली गोलंदाजी करून मिळालेले आव्हान पूर्ण करणे त्यांच्यासाठी सोपे असेल. त्यामुळे मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जे केलं होतं, तेच त्यांनी आता पुन्हा केलं तरच त्यांच्यासाठी प्ले-ऑफचे दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे आता शुक्रवारी मुंबई इंडियन्सचे गोलंदाज पुन्हा एकदा कमाल दाखवतात का, याची उत्सुकता सर्वांना असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: