Ashish Mishra: लखीमपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा नेपाळला पळाल्याचा दावा


हायलाइट्स:

  • आशिष मिश्रा वारंवार लोकेशन बदलत असल्याचं समोर
  • आशिष मिश्राचं लास्ट लोकेशन भारत नेपाळ सीमेवर आढळलं
  • घटनेनंतर पाच दिवस उलटूनही आशिष मिश्राची अद्याप चौकशी नाही

नवी दिल्ली :लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा पोलिसांसमोर होण्याऐवजी नेपाळला पळून गेल्याचा दावा काही वृत्तसंस्थांकडून करण्यात आला आहे. अटकेपासून वाचण्यासाठी आशिष मिश्रा वारंवार आपलं ठिकाण बदलत असल्याचं समोर येतंय. त्याचं शेवटचं ठिकाण नेपाळ सीमेवर आढळलं होतं.

कुठे आहे मुख्य आरोपी आशिष मिश्रा?

आज (शुक्रवारी) सकाळी १०.०० वाजता आशिष मिश्रा याला चौकशीसाठी एसआयटीसमोर हजर होण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. परंतु, आशिष मिश्रा सध्या कुठे आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. त्याचं शेवटचं लोकेशन नेपाळच्या गुरी फेंटा भागाजवळ आढळलं होतं.

आशिष मिश्रा वारंवार आपलं लोकेशन बदलत असल्याचं समजल्यानंतर लखीमपूर खीरी पोलिसांनी आता नेपाळ आणि उत्तराखंड पोलिसांशी संपर्क केला आहे. आशिष मिश्रा याच्याविरोधात हत्येसहीत इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पाच दिवस उलटल्यानंतरही अद्याप त्याची चौकशी करण्यात आलेली नाही.

Lakhimpur Violence: अटक नाही, हत्या प्रकरणातील आरोपी ‘मंत्रीपुत्रा’ला पोलिसांनी धाडले समन्स
Lakhimpur Violence: आरोपी कोण? कुणाला अटक? सर्वोच्च न्यायालयानं यूपी सरकारला विचारला प्रश्न
हिंसाचारात नऊ जण ठार

गेल्या रविवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमापूर्वी लखीमपूर खीरी जिल्ह्यात हिंसाचार घडला होता. या हिंसाचारात एकूण नऊ जण ठार झाले. यामध्ये चार शेतकऱ्यांसहीत एका पत्रकाराचाही समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसा, ज्या महिंद्रा थार गाडीनं शेतकऱ्यांना चिरडलं ती गाडी आशिष मिश्रा चालवत होता. मात्र, मिश्रा कुटुंबीयांकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. आपण घटनास्थळी नसल्याचा दावा आशिष मिश्रा यानं केला होता.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत या प्रकरणात कोण आरोपी आहेत? तसंच कुणाकुणाला अटक करण्यात आलीय? यासहीत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला एक दिवस दिला होता. आज या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे.

India China: अरुणाचलच्या तवांग भागातही भारत – चिनी सैन्य आमने-सामने, LAC चा वाद
bjp national executive : राष्ट्रीय कार्यकारिणीत नेत्याचे नाव, पण नाचक्की होण्याची भाजपला भीतीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: