शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

अंधशाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०४/२०२४- लायन्स क्लब पंढरपूर यांची अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे आज शाळेचे लिपिक नितीन बळवंत कटप व महेश म्हेत्रे सर विशेष शिक्षक यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

स्वागत गीताने मुलांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.त्यानंतर कु.आरोही दगडू वाघमारे हिने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रोहिणी घोडके मॅडम यांनी केले.या कार्यक्रमा करिता अंधशाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *