नियमित वेतन नसणाऱ्यांनाही मिळेल कर्ज; श्रीराम हाऊसिंग फायनान्सने आणली ‘ही’ योजना
हायलाइट्स:
- नियमित वेतन-प्राप्ती नसणाऱ्या ग्राहकांसाठी श्रीराम हाऊसिंग फायनान्सने कर्ज योजनेची घोषणा केली .
- कंपनीने विशेष कर्ज योजनेत प्रक्रिया शुल्कात ०.५० टक्के कपात केली आहे .
- गृहकर्जासाठी आलेल्या ऑनलाईन अर्जांवर व्याज दर ०.५० टक्के कमी आकारला जाईल
पेट्रोल-डिझेलचा भडका; मुंबईत डिझेलने गाठली शंभरी, सलग सहाव्या दिवशी दरवाढीचा झटका
इतर संस्थांकडे सुरू असणारे कर्ज हस्तांतरित करू इच्छिणाऱ्या कर्जदारांसाठी कंपनीने अतिरिक्त प्रक्रिया शुल्क माफीही दिली आहे. सणोत्सवाच्या उत्साहाला द्विगुणित करण्यासाठी, कंपनीने कर्ज वितरण होणाऱ्या प्रत्येक ऑनलाईन अर्जावर प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे . ४ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आणि ३० नोव्हेंबर २०२१ रोजी संपणाऱ्या म्हणजेच दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सुरू राहणाऱ्या या योजनेचा लाभ कर्जदार एसएचएफएल होम लोन अॅप किंवा वेबसाईटद्वारे घेऊ शकतात.
हेल्थकेअर क्षेत्रात गुंतवणूक संधी;बिर्ला म्युच्युअल फंडाने सादर केला निफ्टी हेल्थकेअर ईटीएफ
नवीन कर्जदारांना तसेच इतर वित्तीय संस्थांकडील कर्जदारांना आकर्षित करण्यासाठी या उत्सवी योजनेची घोषणा श्रीराम हाऊसिंग फायनान्सने केली आहे. पतगुणांक (क्रेडिट स्कोअर) ७०० हून अधिक असणाऱ्या ग्राहकांसाठी व्याज दर सरसकट ८.४ टक्क्यांपासून सुरू होईल.
एअर इंडिया स्वगृही ; रतन टाटांनीकेलं स्वागत, म्हणाले आज जेआरडी असते तर…
श्रीराम हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवि सुब्रमणियन सणासुदीनिमित्त आलेल्या या विशेषण योजनेवर भाष्य करताना म्हणाले , “परवडणाऱ्या गृहनिर्माण विभागात मागणीने लक्षणीय कलाटणी घेतल्याचे दिसून येत आहे आणि सणासुदीच्या काळातील बुकिंग ट्रेंड खूप उत्साहवर्धक दिसत आहेत. श्रीराम हाऊसिंग फायनान्स परवडणारी घरे आणि मध्यम बाजारपेठेतील गृहकर्ज विभागांचे संमिश्र प्रतिनिधित्व करते आणि आमचे बहुसंख्य ग्राहक हे नियमित वेतन नसणारे आहेत, याच वर्गाकडून घरांच्या खरेदीसाठी मोठी मागणी नव्याने वाढली आहे. हे नवीन खरेदीदार टियर II आणि टियर III शहरांमधील असून, साथीच्या आधीच्या काळात दिसून आलेल्या मागणीपेक्षा त्यांचा ताजा मागणीचा कल जास्त आहे.
RBI ची मोठी घोषणा; डिजीटल व्यवहारांना दिले प्रोत्साहन, ‘IMPS’ बाबत घेतला हा निर्णय
अनेक ग्राहक त्यांच्या राहण्याच्या जागेचा विस्तार करण्यासाठी किंवा श्रेणीत सुधार म्हणून आधीपेक्षा मोठ्या घरांमध्ये स्थानांतरणासाठी, घराच्या नूतनीकरणामध्ये गुंतवणूक करत आहेत. कोविडप्रेरित साथीच्या काळाचा बहुतांश जाच नियमित वेतन नसलेल्या कर्जदारांना गेल्या दीड वर्षांत सोसावा लागला आहे. रोख प्रवाहाच्या तणावाचा सामना करावा लागलेल्या या मंडळींसाठी आम्ही या सणासुदीच्या योजनेद्वारे आनंद देऊ इच्छित आहोत.’’