मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय एन्काऊंटर केले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नवी दिल्ली / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 – संजय राऊत म्हणतात शिंदेंनी शिंदेच एन्काऊंटर केलं. पण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे एन्काऊंटर केलं.उद्धव ठाकरेंच राजकीय एन्काऊंटर केलं अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली.
अक्षय शिंदे याने केलेला प्रकार निंदनीय होता.माणुसकीला कलंक लावणारी ती घटना होती.मी आणि सर्वांनी मागणी केली होती की,नराधम अक्षय शिंदेला फाशी व्हायला पाहिजे. त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याच्यावर गोळी झाडावी लागली.विरोधी पक्षाने यावर आता राजकारण करण्याची काही गरज नाही असं स्पष्ट मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.दिल्लीतील ना.रामदास आठवले यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मोठ्या पक्षात सीटचा वाद आहे.अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते जागांवर तोडगा काढतील. माझ्या रिपब्लिकन पक्षाला 10 ते 12 जागा आम्हाला मिळाव्यात.या जागा सगळ्या महाराष्ट्रातील आहेत. आम्हाला त्या जागा मिळाल्या तर दलित मतांना महायुतीकडे वळवण्यात यश येईल असे ना.रामदास आठवले म्हणाले.
दलित मतदार आपल्या महायुती च्या बाजूला वळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला एक विधानपरिषद आणि 2 महामंडळं मिळावीत, ही आमची मागणी आहे,असे ना.रामदास आठवले म्हणाले.

