माढ्यात प्रस्थापितांना देणार अभिजीत पाटील धपका

माढा तालुक्यात अभिजीत पाटलांना गाव भेटीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

माढा तालुक्यातील वडोली गावामध्ये अभिजीत पाटलांची घोड्यावरून मिरवणूक

अभिजीत पाटलांना विधानसभेत पाठवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- माढा तालुक्यातील वडोली या गावांमध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे गाव भेटीसाठी गेले असता ग्रामस्थांनी अभिजीत पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले.

घोड्यावरून अभिजीत पाटील यांची मिरवणूक काढल्यानंतर लोकांचं प्रेम काय असतं याचा प्रत्यय मी माढा मतदारसंघा तील जनतेकडून घेतो आहे. व्यक्तीगत माणसांच्या आयुष्यात घोड्यावर बसण्याचा क्षण हा एकदाच असतो परंतू घोड्यावर बसून हालगीच्या तालात आमदार होण्यापूर्वीच आमदार म्हणून अविस्मरणीय मिरवणूक वडोली येथील ग्रामस्थांनी काढली असे उद्गार भारावून गेलेल्या अभिजीत पाटील यांनी काढले.

यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की,माढा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यावर एकच तोडगा म्हणजे बदल करणं आणि त्याच बदलांवर आपल्याला काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे. शेतकऱ्यांचं हित डोळ्या समोर ठेवून अविरत काम करण्याची भुमिका जनमानसात मिसळंल की आपोआप जोड लागते.

यावेळी वडोलीचे सरपंच सतीश काळे, डीव्हीपी बँकेचे नूतन चेअरमन औदुंबर महाडिक, उपसरपंच साधू पडळकर,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शंकर सुरवसे,धनाजी काळे, प्रगतीशील बागायतदार भगवान बंडगर, गोरख पडळकर आदींसह  ग्रामस्थ उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading