BCCIने टी-२० वर्ल्डकप संघात बदल केला का? जाणून घ्या मोठी अपडेट


नवी दिल्ली: थोड्याच दिवसात आयसीसी टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व देशांनी त्यांचे मुख्य संघ काही दिवासांपूर्वीच जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्व देशांना संघ बदलण्यासाठी १० ऑक्टोबर ही अखेरची तारीख दिली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघात काही बदल केले आहेत का त्याबद्दल जाणून घ्या…

वाचा- ICCने केली मोठी घोषणा; या संघाला मिळणार १२ कोटी रुपये

काही दिवसांपासून बीसीसीआय वर्ल्डकपसाठी जाहीर झालेल्या मुळ संघात बदल करू शकते अशी चर्चा सुरू होती. या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे वर्ल्डकपसाठी संघात निवड झालेल्या काही खेळाडूंची आयपीएलच्या १४व्या हंगामातील खराब कामगिरी होय. पण बोर्डातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता मुख्य संघात कोणताही बदल होणार नाही.

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या दोघांनी गेल्या दोन सामन्यात चांगली फलंदाजी करून फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. असे असले तरी दोन खेळाडूंच्या बाबत अद्याप शंका आहे. एक म्हणजे हार्दिक पंड्या आणि दुसरा म्हणजे वरुण चक्रवर्ती होय.

वाचा- मुंबई इंडियन्स घेणार मोठा निर्णय; या खेळाडूंना मिळणार डच्चू!

हार्दिकला फलंदाजीत अद्याप लय सापडली नाही. त्या बरोबर तो गोलंदाजी देखील करत नाही. दुसऱ्या बाजूला वरुणच्या फिटनेसची काळजी अद्याप मिटलेली नाही. वर्ल्डकप संघात बदल न करण्याचा निर्णय घेतला असल तरी प्रत्यक्षात स्पर्धा सुरू झाल्यावर कर्णधार विराट कोहली आणि संघाचा मेंटोर महेंद्र सिंह धोनी हे दोघे मिळून याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे कळते.

बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरुणचा फिटनेस हा मोठा विषय नाही. त्याला फक्त चार षटके गोलंदाजी करायची आहे. पण त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर होऊ शकतो. पण संघाचे संतुलन राखण्यासाठी हार्दिक हा महत्त्वाचा खेळाडू आहे. यासाठी धोनी, विराट, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

वाचा-चेन्नई सुपर किंग्ज जिंकणार IPLचे विजेतेपद; हा मोठा फॅक्टर CSKच्या बाजूने

वरुणच्या बाबत सध्या जी परिस्थिती आहे तशी कर्णधार म्हणून धोनीने हाताळली आहे. जेव्हा सामना जिंकून देणारा खेळाडू उपलब्ध नसतो तेव्हा त्याचा पर्याय शोधावा लागतो. याबाबत धोनीचा अनुभव कामी येऊ शकतो. बीसीसीआयची सर्वात मोठी काळजी हार्दिक पंड्या आहे. जेव्हा फलंदाजी आणि गोलंदाजीचा विचार केला जातो तेव्हा हार्दिक हा एक वेगळा खेळाडू ठरतो. सामना जिंकूण देणारे हार्दिक आणि रविंद्र जडेजा जर फॉर्ममध्ये असतील तर संघाचा फायदा होऊ शकतो. हार्दिकने गोलंदाजी केली नाही तर संघाचे संतुलन बिघडते. यावर धोनी अंतिम निर्णय घेऊ शकतो, असे कळते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: