त्यामुळे नेतृत्व कसे करावे हे शिकायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकावे – ना.रामदास आठवले
नेतृत्व करायला शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदींचा आदर्श घ्यावा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
बडोदा दि. 10 – आपले जीवन स्वतःसाठी जगण्याबरोबरच समाजासाठी ही आपल्या जीवनातील काही भाग खर्च केला पाहिजे. नेतृत्व करायचे असेल तर स्वार्था पलीकडे जाऊन समाजाचा ; देशाचा विचार केला पाहिजे. राष्ट्रनिर्माते महापुरूष राष्ट्रपुरुषांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. आताच्या राजकीय परिस्थितीत आजच्या नेत्यांकडून नेतृत्व गुण शिकताना विद्यार्थ्यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा. मोदींनी आपले जीवन पूर्णपणे देशासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे नेतृत्व कसे करावे हे शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकावे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
विद्यार्थ्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला पाहिजे असेही ना.रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले . बडोदा येथील पारूल युनिव्हर्सिटी मध्ये स्कुल ऑफ लीडरशिप अंतर्गत लोकशाहीत युवकांचा सहभाग या विषयावर ना. रामदास आठवले यांचा विद्यार्थ्यांशी संवाद आयोजित केला होता. त्यात ना.रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पारुल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरु पारुल पटेल ;डॉ हितेंद्र पटेल; तसेच छात्रभारती चे अध्यक्ष कुणाल शर्मा; बडोदा मनपा स्थायी समिती अध्यक्ष जे बी पटेल ; रिपाइं चे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोक भट्टी; प्रभारी जतीन भुट्टा; लीलावतीबेन वाघेला; राजेश कुमार गोयल; तृष्णा व्यास;राजू तायडे; उपस्थित होते.
पारुल युनिव्हर्सिटी ला केंद्र सरकार च्या मंत्रालयातर्फे आपण मदत करू; गरीब विद्यार्थ्यांना पायल युनिव्हर्सिटी ने मदत करावी; विद्यार्थ्यांना नेतृत्व प्रशिक्षणासाठी स्कुल ऑफ लिडरशीप ही संकल्पना चांगली असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.