तर व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकते – सौ.नंदिनी जाधव
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त चर्चासत्र

सोलापूर ,१०/१०/२०२१ - लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्यावतीने आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सोलापुरातील गांधीनगर येथील द हेरिटेज मंगल कार्यालय बी लाॕन येथे अध्यक्ष लायन सौ. नंदिनी जाधव व सचिव लायन अभियंता सागर पुकळे व माजी अध्यक्ष लायन विश्वनाथ स्वामी यांच्या यांच्या हस्तेतर व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकते परंतु श्री गणरायाची पूजा करून या चर्चासत्राचे सुरुवात करण्यात आली .
आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष सौ.नंदिनी जाधव यांनी मन व शरीर एकमेकांना पूरक आहेत मन स्वस्थ असेल तर व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकते परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्याने वेगवेगळे मानसिक आजार बळावत आहेत. समाज मनोरुग्णांकडे आणि मानसिक आजारांकडे दुषित नजरेने पाहतो. हा कलंक पुसून काढण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्टोबर हा दिवस “जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) साजरा केला जातो असे सांगितले .
सचिव अभियंता सागर पुकाळे यांनी सध्याच्या स्पर्धात्मक, धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्याने वेगवेगळे मानसिक आजार बळावत आहेत. कोव्हिड महामारी व त्याला आळा घालण्यासाठी केलेले लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंग इत्यादी बंधनांमुळे प्रत्येक व्यक्तीला आर्थिकच नाही तर प्रचंड मानसिक भावनिक आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. अशा संकटसमयी मानसिक खच्चीकरण टाळण्यासाठी आम्ही लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी च्या माध्यमातून ते चर्चासत्र घडवून त्यावर प्रबोधन करत असल्याचे सांगितले.
यावेळी विश्वनाथ स्वामी,ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन अवधूत औदप्पा पुजारी यांनी केले .आभार प्रदर्शन सागर पुकाळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लायन राजेश परसगोंड यांनी प्रयत्न केले.
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने हेरिटेज मंगल कार्यालय येथे जागतिक मानसिक आरोग्य दिना निमित्त 1 दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.