पाकिस्तानचे वादग्रस्त अणुशास्त्रज्ञ ए. क्यू खान यांचे निधन


इस्लामाबाद: पाकिस्तानाचे वादग्रस्त अणुशास्त्रज्ञ ए. क्यू खान (वय ८५) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ‘पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक’ असे बिरुद त्यांना लावण्यात येत होते. मात्र, अणुतंत्रज्ञानाची तस्करी आणि अणुतंत्रज्ञानाचा अवैध प्रसार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणामुळे २००४पासून ते नजरकैदेतच होते.

खान यांना करोनासंसर्ग झाल्याचे २६ ऑगस्टला निष्पन्न झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. फुफ्फुसामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर खान रिसर्च लॅबोरेटरीज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्याच नावावरून या रुग्णालयाला नाव देण्यात आले आहे. इस्लामानाबादच्या फैझल मशिदीमध्ये त्यांच्या अंत्यविधीची नमाज अदा करण्यात आली. यावेळी अनेक मंत्री आणि संरक्षण दलांतील अधिकारी उपस्थित होते.

पँडोरा गौप्यस्फोट: पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधक अडचणीत

पँडोरा प्रकरण: मुशर्रफ यांच्यासोबतच्या ‘डील’नंतर हिंदी चित्रपटांवरील बंदी हटवली?
पाकिस्तान सरकारने खान यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. ‘डॉ. ए. क्यू. खान यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. देश त्यांची सेवा कधीही विसरू शकणार नाही,’ या शब्दांमध्ये पाकचे अध्यक्ष अरिफ अल्वी यांनी श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही श्रद्धाजली वाहिली असून, खान पाकिस्तानच्या नागरिकांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व होते, असे त्यांनी म्हटले आहे.

कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा; पाकिस्तान कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश
स्वातंत्र्यापूर्वी १९३६मध्ये खान यांचा भोपाळमध्ये जन्म झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानात गेले होते. खान नेदरलँडमध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी त्यांना पाकिस्तानात आणले होते. त्यावेळी त्यांनी तंत्रज्ञान आणि सेंट्रीफ्युजेस चोरल्याचाही आरोप करण्यात आला होता. खान १९७६मध्ये पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमात सहभागी झाले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: