नगररचना सहाय्यकाला मारहाण प्रकरणी लायसन्स इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध

नगररचना सहाय्यकाला मारहाण प्रकरणी लायसन्स इंजिनिअर असोसिएशनच्यावतीने जाहीर निषेध

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०९/२०२४- पंढरपूर नगरपरिषद येथील नगर रचना सहाय्यक इंजिनीयर सुहास झिंगे यांना मारहाण करण्यात आली होती.

या झालेल्या मारहाण प्रकरणानंतर लायसन्स इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनिअर सारंग कोळी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरपालिकेचे इंजिनिअर सोमेश धट आणि सुहास झिंगे यांच्यासमवेत याप्रकरणी सविस्तर चर्चा करण्यात आली.

एखादे काम सामोपचाराने होत असताना मारहाण करणे हे गैर आहे म्हणून आम्ही लायसन्स इंजिनीयर असोसिएशन तर्फे या घटनेचा तीव्र जाहीर निषेध करीत असून आम्ही सदैव नगर परिषद कर्मचार्यांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही लायसन्स इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष सारंग कोळी यांनी दिली.

याप्रसंगी बोलताना उपमुख्याधिकारी ॲड सुनील वाळूजकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना जनतेची कामे वेळेत व तत्परतेने करून द्यायच्या सूचना दिल्या.

सचिव सोमनाथ काळे ,बाळ कुंभार, पांडुरंग आलोनी, इमरान बेद्रेकर यांनी आपल्या अडीअडचणी मांडल्या व पेंडींग फाईल संदर्भात चर्चा केली. याप्रसंगी सचिन माळवदे ,सचिन पाटील, हनुमंत खिलारे, संतोष रोपळकर ,ललित पाटील,अमित लाडे ,सचिन धुमाळ ,गोपाळ धोत्रे डी.जे. गव्हाणे, जमीर शेख आदींसह इंजिनियर्स उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading