धोनीच्या ६ चेंडूत १८ धावा: विराट म्हणाला, किंग इज बॅक; ओम फिनिशाय नम:


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील पहिली क्वॉलिफायलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जला अखेरच्या १२ चेंडूत २४ धावांची गरज होती. १९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सेट फलंदाज ऋतुराज गायकवाड बाद झाला. गेल्या दोन वर्षातील अनुभवानुसार अशा परिस्थितीत रविंद्र जडेजा फलंदाजीला येतो. पण यावेळी जडेजाच्या जागी धोनी दिसला आणि सर्वांची काळजी थोडी वाढली.

वाचा-आले शंभर, गेले शंभर; चेन्नई सुपर किंग्ज एक नंबर; असे कमबॅक कोणालाच जमले नाही

धोनी हा सर्वोत्तम फिनिशर आहे. पण गेल्या दोन वर्षात त्याला धावा करता आल्या नाहीत. या हंगामातील एका सामन्यात त्याने २७ चेंडूत फक्त १५ धावा केल्या होत्या. त्यामुळे धोनी करू शकतो यावर विश्वास होता पण तो पुन्हा तशी फलंदाजी करले का याबद्दल थोडी शंका होती. मोईन अलीने १ चौकार आणि एक धाव करून धोनीला स्ट्राईक दिला. धोनीला पहिल्या चेंडूवर धाव घेता आला नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आता ८ चेंडूत १९ धावा हव्या होत्या. धोनीने आवेश खानच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारला आणि चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला. २०व्या षटकात ६ चेंडूत १३ धावा हव्या होत्या. पहिल्या चेंडूवर मोईन अली बाद झाला आणि धोनी स्ट्राईकवर आला. दुसऱ्या बाजूला जडेजा उभा होता. पण यावेळी धोनीने जबाबदारी स्वत:वर घेतली. त्याने टॉम करनला सलग दोन चौकार मारले आणि ३ चेंडूत ५ धावा असे समिकरण केले. चौथा चेंडू वाइड गेला. त्यानंतर धोनीने चौकार मारून विजय साकारला. धोनीने ६ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट ३०० इतका होता.

वाचा- मुंबई इंडियन्स घेणार मोठा निर्णय; या खेळाडूंना मिळणार डच्चू!

धोनीच्या या फलंदाजीवर चेन्नईचे खेळाडू, चाहते जाम खुश झाले. पण अशाच आनंद भारताचा कर्णधार आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याला झाला. चेन्नईने विजय मिळवल्यानंतर विराटने एक ट्विट केले ज्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. विराट म्हणतो, …आणि किंग परत आला. क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात महान फिनिशर, आज त्याने पुन्हा एकदा खुर्चीवरून उडी मारण्यास भाग पाडले.

वाचा- क्रिकेट न्यूजBCCIने टी-२० वर्ल्डकप संघात बदल केला का? जाणून घ्या मोठी अपडेट

विराटचे हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. चेन्नई संघाने देखील त्याचे हे ट्विट शेअर केले आहे.

या शिवाय भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने धोनी फलंदाजीवर आणि चेन्नईच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. सेहवाग म्हणतो, ओम फिनिशाय नमः ! चेन्नईचा शानदार विजय, ऋतुराजची टॉप क्लास खेळी, उथप्पा क्लास होता आणि धोनीने हे सिद्ध करून दाखवले की टेंपरामेंट किती गरजेचा असतो. केल्या वर्षी खराब कामगिरीनंतर सीएसकेने जबरदस्त फाइटबॅक केले आणि फायनलमध्ये स्थान मिळवले.

वाचा- ICCने केली मोठी घोषणा; या संघाला मिळणार १२ कोटी रुपयेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: