बाह्य वळण मार्गातील चौका चौकात गतिरोधक व सुचना फलक लावा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन छेडणार…शिवसेनेचे बांधकाम विभागास निवेदन
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि २६ – पंढरपूर शहराच्या बाह्य वळण मार्गावरील क्रांतीसिह नाना पाटील चौक, प्रबोधनकार ठाकरे चौक, अहिल्या चौक ,कासेगाव फाटा,पंत चौक आदी ठिकाणी गतिरोधक व सुचना फलक नसल्याने बाह्य वळण मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे वारंवार अपघात घडत आहेत. कित्येक माणसांना आज पर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे .
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे.वाहने वेगाने जात आहेत.या बाह्य वळण मार्गावरील चौका चौकात सुचना फलक व स्पीडब्रेकर आसणे अतिशय गरजेचे आहे.या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत ज्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर आरोपींची ओळख पटविण्यासाठी यांचा फायदा होणार आहे.मध्यंतरी एक व्यापारी लिंक रोडवर रस्ता क्रॉस करताना मागून आलेल्या वेगातील बुलेटने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.याची कोणीही दखल घेतली नाही.
पंढरपूर शहरातील अंतर्गत रस्त्यावरून बाह्य वळण मार्गाला जोडणाऱ्या प्रत्येक चौकात गतिरोधक व सुचना फलक लावल्यास याचा फायदा होऊन अपघातांचे प्रमाण कमी होऊन अनेक जीव वाचतील.तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने याची गंभीर दखल घेऊन त्वरित स्पीडब्रेकर व सुचना फलक उभे करावेत अन्यथा बांधकाम प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येईल व होणार्या परिणामास बांधकाम प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बंडू घोडके यांनी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ व पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या आदेशाने लेखी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे
यावेळी जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, इंद्रजित गोरे, संजय घोडके ,नागेश रितुंड, अर्जुन भोसले, उत्तम कराळे, संगिताताई पवार ,अनिताताई आसबे ,संजय पवार, कल्याण कदम ,बाबासाहेब पाटील, महमंद पठाण ,जालिंदर शिंदे, अदित्य घोडके, आकाश माने,नामदेव चव्हाण,विजय बागल, नागेश जाधव,महावीर हाके,बळीराम देवकते,अजित पवार ,हर्षवर्धन जाधव आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.