जागतिक एड्स दिन सप्ताह : पंढरपूरमध्ये कॅन्डल मार्च द्वारे जनजागृतीचा निर्धार

जागतिक एड्स दिन सप्ताह : पंढरपूरमध्ये कॅन्डल मार्चद्वारे जनजागृतीचा निर्धार

एड्सबद्दल जागरूकतेचा प्रकाश एचआयव्ही/एड्सविरोधात एकजूट — पंढरपूर एआरटीला देशात तृतीय, राज्यात प्रथम क्रमांकाचा मान

कॅन्डल मार्चमध्ये श्रद्धांजली, सेवेत उत्कृष्टतेचे कौतुक

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. 08 :उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे जागतिक एड्स दिन सप्ताह साजरा करण्याचा एक भाग म्हणून आयसीटीसी, एआरटी सेंटर आणि समग्र सामाजिक प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. फुलं व रंगीत रांगोळीच्या आकर्षक सजावटीतून एड्सबाबत जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.

या वर्षीचे ब्रीदवाक्य- अडथळ्यावर मात करू,एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ, नव परिवर्तन घडवू!! असून याभोवती कार्यक्रमाची संकल्पना रचली होती.

कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक धोत्रे यांनी पंढरपूर एआरटी केंद्राला देशपातळीवर मिळालेल्या तृतीय क्रमांकाचा व राज्यात मिळालेल्या प्रथम क्रमांकाचा उल्लेख करून संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. “रुग्णांना उत्तम सेवा व सुविधा देणे हीच खरी कर्तव्यपूर्ती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी प्रस्ताविकेत एचआयव्ही/एड्समुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांना कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे सांगितले. तसेच एआरटी औषध व्यवस्था, CD4/Viral Load तपासणी, आहार मार्गदर्शन, गरोदर माता समुपदेशन व विविध शासकीय योजना या सर्व सेवा गरजू रुग्णांना मोफत उपलब्ध असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमास डॉ. निलेश लांब,डॉ.अविनाश वुईके,डॉ.विनिता कार्यकर्ते, मेट्रन सिंधू लवटे, सिस्टर इन्चार्ज रेवती कुलकर्णी तसेच अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम कदम यांनी केले . आभार प्रदर्शन डॉ. अविनाश वुईके यांनी केले.रांगोळी व फुलांची आकर्षक सजावट औषध निर्माण अधिकारी विद्या माने यांनी केली.

या उपक्रमासाठी बाजीराव नामदे, नागेश देवकर,भगवंत भोसले,दीपक गोरे, युवराज वांगी,संतोष शेंडगे,बाळासाहेब पांढरे,संदीप देशमुख,धनंजय कुंभार,रवी गोरे,आशुतोष भातलवंडे,स्वाती माने, मिनाक्षी कदम,रुपाली देवकर,सुज्ञाता गायकवाड, मेघा चंदनशिवे, किशोर जाधव,विशाल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Back To Top