CNG Price Hike : अदानी गॅसनेही सीएनजीच्या किंमतीत केली वाढ


हायलाइट्स:

  • अदानी गॅसने सोमवारपासून (११ ऑक्टोबर) सीएनजीच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
  • सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने २ ऑक्टोबरलाच गॅस दरात वाढ केली.
  • नैसर्गिक वायूच्या किंमती ६२ टक्क्यांनी वाढल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढल्या आहेत.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात (सीएनजी/पीएनजी मार्केट) दिसून येत आहे. राजधानी दिल्ली (एनसीटी) तसेच एनसीआरच्या काही शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) या कंपनीने २ ऑक्टोबरलाच गॅस दरात वाढ केली. त्यामुळे फरिदाबादमधील गॅस पुरवठा करणारी कंपनी अदानी गॅसनेही सोमवारपासून (११ ऑक्टोबर) सीएनजीच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

दरवाढीचा सपाटा कायम ; सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले, हा आहे आजचा दर
अदानी गॅस लिमिटेडने दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबाद जिल्ह्यात सीएनजीच्या किमतीत १ रुपये ४४ पैसे प्रति किलोने वाढ केली आहे. आतापर्यंत फरिदाबादमध्ये ५६.५१ प्रति किलो दराने सीएनजी मिळत होता, पण आता तो ५७.९५ रुपये प्रति किलो झाला आहे. हा निर्णय आजपासून लागू करण्यात आला आहे.

सोने-चांदी झाले स्वस्त; नफावसुलीने कमॉडिटी बाजारात घसरण, जाणून घ्या आजचा भाव
६० हजारहून अधिक वाहनांवर होणार परिणाम
दरवाढीचा थेट परिणाम ६० हजारांहून अधिक वाहनांवर होणार आहे. सध्या फरीदाबाद जिल्ह्यात १९ सीएनजी स्टेशन आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग सेक्टर-९, १७, २४, क्राउन प्लाझा, सेक्टर-२० ए, बी, एस्कॉर्ट्स कंपनीच्या समोर, यामाहा कारखान्यासमोर, सिक्रीजवळ आणि बायपास रोडचा समावेश आहे. या सीएनजी स्टेशनवर दररोज दोन लाख किलोहून अधिक सीएनजीचा पुरवठा केला जातो.

बिटकॉइनची वाटचाल रेकॉर्डच्या दिशेने ; जाणून घ्या आज कितीने महागले डिजिटल करन्सी
राजधानीत आधीच उडाला दरवाढीचा भडका
देशातील प्रमुख शहरांमधील गॅस वितरण कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने शनिवारपासून (२ ऑक्टोबर) दिल्लीत सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, नैसर्गिक वायूच्या किंमती ६२ टक्क्यांनी वाढल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढल्या आहेत.

केंद्र सरकारचा विक्रीचा धडका; एअर इंडिया विकली आता ‘या’ कंपनीची होणार विक्री
२०१२ नंतर सीएनजीच्या किमतीत सर्वात मोठी वाढ
सध्या सीएनजीच्या किमतीत झालेली वाढ ही २०१२ नंतरची सर्वात मोठी वाढ आहे. अलीकडेच, आयजीएलने दिल्लीमध्ये सीएनजीच्या किंमतीत २.२८ रुपयांनी वाढ केली आहे, तर नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडामध्ये ती २.५५ रुपयांनी वाढली आहे. त्याचबरोबर पाईपद्वारे लोकांच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या पीएनजीच्या किंमतीत २.१० रुपये प्रति घनमीटरने वाढ करण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: