शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ सप्टेंबर २०२४- शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, महाविकास आघाडीच्यावतीने संग्राम मोर्चा मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दडपशाही, भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी सरकार विरोधात मंगळवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता चार हुतात्मा पुतळा या ठिकाणापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे या मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत.

केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापुर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासनं दिली होती. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करण्यापासून सरकार अंगकाढू भूमिका घेताना दिसून येत आहे.त्यातच वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यामुळे तो मेटकुटीला आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबीत आहेत .
1) शेती मालाला हमीभाव मिळत नाही.
2) सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार?
3) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले परंतु नुकसानीची भरपाई मिळाली नाही याचा जाहीर निषेध.
4) शेतकऱ्यांच्या पाणी पट्टीत केलेल्या 10 पट वाढीचा निषेध.
5) शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा दया.
6) शेती अवजारे, खत व औषधे यावरील GST रदद् करा.
7) 7.5 HP विज बिल माफ केले. 8 / 9 HP पुढील विज बील माफ कधी होणार?
8) PM किसानची रक्कम सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही.
9) शेतीसाठी कॅनल मधून पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही.
10) सोयाबीन, तूर, कांदा, उडीद व फलबाग यांचा पिक विमा विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मिळत नाही.
11) ज्या त्या भागात जे पिक घेतलं जातं त्याचा समावेश पिक विम्यात करण्यात यावा.
12) प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी गायरान जागा गावठाण करावी किंवा गायरान जोवर घरकुल बांधण्याची परवानगी दयावी.
13) ओला दुष्काळ जाहीर करा.
14) प्रत्येक गावात ग्रामसेवक / कोतवाल यांची नियुक्ती करावी.
15) गावास स्वतंत्र महावितरण वायरमन उपलब्ध करून दयावा.
16) गावाला व शेतकऱ्यांना मागणीनुसार MSEB DP देण्यात यावा.
17) नदीला पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा पूणवेळ दयावा.
18) जल-जीवन योजनेचा अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावा.
19) दुधाला 40 रु दर मिळावा व दूध अनुदान शेतक-याच्या थेट खात्यामध्ये देण्यात यावे.
20) सर्व प्रकारच्या रेशनकार्ड धारकांना धान्य मिळावे.
21) गाव दत्तक घेतलेल्या बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही.
22) शेतक-यांच्या वर्ग 2 जमीनी वर्ग 1 करण्यात यावेत.
23) सर्व रस्ते plan मध्ये घ्यावे. Plan – Non Plan असा भेदभाव नको.
24) DCC बँकेने शेतकऱ्यांना पूर्वप्रमाणे कर्ज पुरवठा करावा.
25) मंगळवेढा तालुका २४ गाव उपसा सिंचन योजना त्वरीत कार्यान्वित करावी.
26) मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजास आरक्षण द्यावे.

या व इतर प्रश्नावर हा मोर्चा काढण्यात येणार असून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, नागरिक, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाही व्हावे असे आवाहन खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे,शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते भारत जाधव, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष अजय दासरी, अमर पाटील, प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,मोहोळ तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, दादा साठे,अशोक देवकते, संदीप पाटील, मनोज यलगुलवार,भारत जाधव, राजेश पवार, देवाभाऊ गायकवाड,तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते.

