₹ ४,४४,४४,४४४ किंमतीच्या चलनी नोटांनी सजलं मातेचं मंदिर!


हायलाइट्स:

  • तेलंगणातील कन्यका मातेचं मंदिर चर्चेत
  • मंदिर सजावटीसाठी तब्बल ४,४४,४४,४४४ रुपयांच्या नोटांचा वापर
  • आंध्रातही कन्यका माता मंदिर सजावटीसाठी चलनी नोटांचा वापर

तेलंगणा : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात नवरात्रौत्सव आणि दूर्गा पूजेचं भव्य दिव्य स्वरुप पाहायला मिळतं. यंदा करोना संक्रमणातही अनेक ठिकाणी असे भव्य दिखाव्यांसहीत मंडप सजलेत. तेलंगणाच्या महबूबनगर जिल्हा केंद्र स्थित कन्यका परमेश्वरी देवीचं मंदिरही याचसाठी चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे, यंदा मंदिर सजवण्यासाठी तब्बल ४ कोटी ४४ लाख ४४ हजार ४४४ रुपयांच्या खऱ्याखुऱ्या नोटांचा वापर करण्यात आलाय.

कन्यका परमेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल होणारे भक्त अनेक प्रकारे दान – देणग्या देतात. यामध्ये नोटांसहीत सोन्या चांदीच्या दागिन्यांचा आणि वस्तूंचाही समावेश असतो.

यंदा भाविकांकडून देणगी स्वरुपात मिळालेल्या नोटांचाच वापर मंदिराच्या सजावटीसाठी करण्यात आवा आहे. मंदिर सजावटीसाठी नोटांना दुमडून त्यांना फुलांचं स्वरुप देण्यात आलं आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दूर्गामातेला महालक्ष्मीच्या रुपात सजवण्यात आलं आहे.

मंदिरातील मूर्ती आणि भिंतींना नोटा चिपकावून हे मंदिर सजवण्यात आलंय. त्यामुळे, भाविकांच्या नजराही मंदिरावरून लवकर हटताना दिसत नाहीत.

देशात निर्णय घेणारे सरकार, पंतप्रधान मोदींनी स्वत:चीच पाठ थोपटली
RTI Day: ‘आरटीआय’साठी लढणाऱ्यांना हवी सुरक्षा

आंध्र प्रदेशातही मंदिर सजवण्यासाठी चलनी नोटांचा वापर

दुसरीकडे, आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातही कन्यका परमेश्वरी देवीचं मंदिर चलनातील नोटांनी सजवण्यात आलंय. तसंच सजावटीसाठी सोन्या – चांदीचाही वापर करण्यात आला आहे.

नवरात्री आणि दूर्गा पूजेच्या निमित्तानं नेल्लूर शहराच्या स्टोन हाऊस पेटा भागात स्थित हे कन्यका परमेश्वरी देवीचं मंदिर माता धनलक्ष्मीच्या रुपात सजवण्यात आलंय.

यासाठी मंदिरात भाविकांनी दान केलेल्या ५.१६ कोटी रुपयांच्या चलनी नोटांचा वापर करण्यात आलाय. यामध्ये २००० रुपये, ५०० रुपये, २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये आणि १० रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे.

दरवर्षी कन्यका मातेच्या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. भाविकांकडून लाखो रुपयांच्या देणग्या मंदिरांना प्राप्त होतात. या पैशांचा वापर मंदिर सजवण्यासाठी केला जातो.
petrol diesel price hike : इंधनाचे दर का वाढले? पेट्रोलियम राज्यमंत्री म्हणाले, ‘करोनाच्या मोफत लसीसाठी पैसा कुठून येणार ‘
it raids : नोटांच्या बंडलनी खच्चून भरले कपाट! IT च्या छाप्यात १४२ कोटींची रोकड जप्तSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: